समाजातील अंधश्रद्धा अनिष्ट रूढी परंपरा घालवण्यासाठी शिक्षणाचे कास धरावी-आमदार संभाजी पाटील निलंगेकर
निलंगा:-निलंगा येथे थोर समाज सुधारक डॉक्टर संतुजी रामजी लाड यांच्या 182 व्या जयंतीनिमित्त हिंदू खाटीक कलाल समाजाचा मेळावा संपन्न झाला. डॉक्टर संतुजी लाड यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रल्हाद बाहेती तो प्रमुख म्हणून भाजपचे जिल्हा संघटन मंत्री संजय दोरवे, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे,संजय जेवरीकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शेषराव मंमाळे, हिंदू खाटीक महासंघाचे सोलापूरचे रवींद्र गायकवाड सचिन आनंद जमदाडे सुभाष कोथमीरे भुईकोटचे संजय घोलप उमरगा येथील समाजसेवक आलुरकर सर, अशोक घोडके सुधीर थोरात प्रकाश कांबळे देवणी तालुक्यातील बालाजी तपासे जनार्दन टोम्पे होलसेल येथील काशिनाथ कांबळे निलंगा येथील अशोक हातागळे तानाजी आर्य श्रीनिवास हातागळे आधी प्रमुख यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले की थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या खांद्याला खांदा लावून 160 वर्षांपूर्वी समाजातील अंधश्रद्धा अनिष्ट रूढी परंपरा दूर करून दिन दलित सर्वहारा समाजासाठी शिक्षणाचे द्वारे खुले करून देण्याचे कार्य त्या काळामध्ये डॉक्टर संतुजी लाड यांनी केले.
कोरोना सारख्या संसर्गजन महामारी सारखी त्या काळामध्ये प्लेगची साथ आली होती गावच्या गाव ओस पडत होते अशाप्रसंगी डॉक्टर म्हणून मानवतेच्या भावनेने जनसेवेचे कार्य जीवाची परवा न करता त्या काळामध्ये डॉक्टर संतुजी लाड यांनी केली. अशा थोर समाजसुधारकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आजच्या विज्ञान युगातील समाज बांधवांनी आपल्या समाजातील अंधश्रद्धा आणि परंपरा काढून टाकण्यासाठी शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचे आहे त्यामुळे सर्व माता भगिनींनी आपल्या कुटुंबातील प्रत्येक मुला मुलींना शिक्षण द्या.तरच आपली व आपल्या देशाची प्रगती होऊ शकते त्यामुळे आपली मुलं मुली जागतिक स्पर्धेच्या युगामध्ये टिकून राहण्यासाठी शिक्षण हाच पर्याय आहे त्यामुळे आपण सर्वांनी शिक्षण शिक्षणाची कास धरावी असे आव्हान केले. हिंदू खाटीक समाजाच्या सर्व प्रश्नांची सोडूवनुक करू तसेच आपल्या समाजातील गरीब कुटुंबातील विद्यार्थीना उच्च शिक्षणासाठी कुठलीही अडचण आली तर ती अडचण सोडवण्यासाठी सदैव तत्पर राहीन असे आश्वासन दिले . विखुरल्या गेलेल्या हिंदू खाटीक समाज बांधवांना एकत्रित आणण्याचे काम करणारे डॉ.प्रमोद हातागळे यांचे कौतुक केले. डॉक्टर संतुजी लाड यांच्या कार्यावर आधारित पुस्तिकेचे मोबाईल संपर्क डायरीचे इमोचन यावेळेस करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष समारोप प्रल्हाद बाहेती यांनी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ प्रमोद हातागळे, सूत्रसंचालन विठ्ठल चांभारगे सर तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक प्रकाश डोंगरे सर यांनी केले. कार्यक्रमास लातूर उस्मानाबाद बिदर गुलबर्गा जिल्ह्यातील मान्यवर निलंगा येथील सर्व समाज बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे पण वाचा
…तर रवींद्र धंगेकरच पुणे लोकसभेचे उमेदवार?