कृषि उत्पन्न बाजार समिती, लातूर च्या वतिने सोयाबीन शेतमाल तारण योजनेचा 1नोव्हेंबर रोजी शुभारंभ*
लातूर
माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आमदार अमितजी देशमुख, माजी आमदार धिरज देशमुख साहेब यांचे मार्गदर्शक सुचना प्रमाणे राज्यात नावलौकिक असलेल्या लातूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतिने सोयाबीन शेतमाल तारण योजनेचा शुभारंभ 1नोव्हेंबर रोजी बाजार समितीचे सभापती जगदीशराव बावणे यांच्याअध्यक्षतेखाली करण्यात येणार असून हा शुभारंभ शुक्रवार दि. ०१/११/२०२५ रोजी दोन ठिकाणी होईल सकाळी ठिक ११:०० वाजता एम आय डी सी परिसरात असलेल्या बाजार समितीचे लातूर गोडावुन लातूर तर दुपारी ठिक १ वाजता उपबाजार पेठ मुरुड येथे माजी आमदार श्री. वैजनाथदादा शिंदे यांचे शुभहस्ते हा कार्यक्रम करण्यात येणार आहे. प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित जिल्हा उपनिबंधक एस.व्ही. बदनाळे उपसरव्यवस्थापक महादेव भरडे
ट्वेंटी वन शुगर लातूर चे उपाध्यक्ष विजय देशमुख, विलास साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष रवींद्र काळे , कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुनिल पडीले तसेच सर्व सन्माननीय संचालक मंडळ उपस्थित राहणार आहेत सध्या सोयाबीनच्या दरात दररोज चढ-उतार होत असल्याने शेतकरी संभ्रमात पडत आहेत. अडचणीच्या काळत शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे यांचे परिपत्रक दि. २३/०९/२०२१ नुसार ही योजना लागू आहे.
शेतमालाची किंमत ही तत्कालीन बाजार भाव किंवा शासनाने जाहीर केलेली आधारभूत किंमत यापैकी जी कमी असेल, त्यानुसार ठरविण्यात येईल. मालतारण ठेवल्यानंतर शेतकऱ्या-यांना ७५% रक्कम केवळ ६% व्याज दराने ०६ महीन्याच्या कालावधीसाठी मिळणार आहे. यामुळे शेतकरी बांधवांचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. शेतमाल तारण योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे उपसभापती सुनील पडिले प्रभारी सचिव अरविंद पाटील सर्व संचालक मंडळ यांनी केले आहे

