• Sun. Dec 7th, 2025

निलंगा तालुक्यातील निकृष्ट रस्ते बांधकाम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासणार-डॉ नरसिंह भिकाने

Byjantaadmin

Oct 27, 2025

निलंगा तालुक्यातील निकृष्ट रस्ते बांधकाम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासणार-डॉ नरसिंह भिकाने

निलंगा येथे मनसे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुकाध्यक्ष सचिन बिराजदार यांच्या नेतृत्वाखाली निलंगा येथे जि प बांधकाम उपविभागीय कार्यालय येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निलंगा तालुक्यातील कासार सिरसी भागातील निकृष्ट दर्जा च्या रस्त्यानसंदर्भात चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर व संबंधित गुत्तेदारांवर रीतसर कार्यवाही करण्यात यावी यासाठी निवेदन देण्यात आले.कासार सिरसी भागात सध्या रस्त्यांची खूप बिकट अवस्था आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजसला जाणे कठीण झाले आहे.हे रस्ते म्हणजे अपघाताला नीमंत्रणच आहेत.दररोजरोज ह्या रस्त्यांमुळे अपघात होतात व कित्येक कुटुंबाना आपल्या घरातील व्यक्तीना गमवावे लागत आहे.कासार सिरसी भागात विकासाच्या नावावर फक्त बोगस रस्ते आहेत बिल मात्र पूर्ण उचलली  जातात आणी काही आर्थिक लाभा पाई संबंधित अधिकारी कामाचा दर्जा न तपासताच कामाला मान्यता देतात अश्या जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कार्यवाही करण्यात यावी.उपकार्यकारी अभियंता यांनी पुढील दहा दिवसात यादी मध्ये दिलेल्या सर्व कामांची रीतसर चौकशी करून अहवाल तयार करून संबंधित अधिकारी यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे ते नाही झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने खळखट्याक आंदोलन करण्यात येईल.चौकट[संबंधित रस्त्यांची चौकशी समिती नेमून तात्काळ स्पॉट पंचनामा करत हा सूर्य हा जयद्रथ या न्यायाने चौकशी करावी व दोषी अधिकाऱ्यांवर कडक कायदेशीर कार्यवाही करावी अन्यथा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फसल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाने यांनी बांधकाम विभागाला दिला आहे.]यावेळी प्रदीप शेळके,शहारध्यक्ष अबुबकर सय्यद,शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष सदाशिव हाडोळे,शिवराज चिंचोळे,तालुका उपाध्यक्ष विकास सूर्यवंशी, सोमलिंग पाटील,बालाजी पवार,कृष्णा सुरवसे, विभागअध्यक्ष बालाजी खिचडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *