• Sun. Dec 7th, 2025

रेणा साखर कारखान्याचा 20 वा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ संपन्न 

Byjantaadmin

Oct 31, 2025

रेणा साखर कारखान्याचा 20 वा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ संपन्न 

दिलीपनगर निवाडा :- 

   रेणा सहकारी साखर कारखाना लि, दिलीपनगर या सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम 2025-26 चा 20 वा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ  मंगळवार, दिनांक 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.25 मिनिटाच्या शुभमुर्हुतावर कारखान्याचे  अध्यक्ष मा.श्री अनंतराव ठाकूर (देशमुख) व उपाध्यक्ष मा.ॲड.श्री. प्रवीण पाटील यांच्या शुभहस्ते व सर्व सन्माननीय संचालक मंडळ व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

 तत्पूर्वी  गळीत हंगाम 2024-25 मध्ये सहा विभागातून कारखान्यास जास्तीत जास्त ऊस पूरवठा केलेल्या ऊस उत्पादक शेतकरी अनुक्रमे रेणापूर विभाग – सौ.व श्री. शेख जाकीर शेख हमीद, रा. इंदरठाणा,  पोहरेगांव विभाग – सौ. व श्री. गणेश अच्युतराव पवार, मोटेगांव, पानगांव विभाग – सौ. व श्री. जगन्नाथ व्यंकटराव नरहरे, फावडेवाडी, खरोळा विभाग – सौ. व श्री. व्यंकटेश अनंतराव देशमुख, खरोळा, बाभळगांव विभाग – सौ. व श्री. लक्ष्मीकांत रंगराव पाटील, कवठा व महमदापूर विभाग –सौ. लताबाई व श्री. ज्ञानोबा पडीले, सलगरा बु. यांचे व कारखान्याचे संचालक मा. सौ. वैशालीताई व श्री. पंडीतराव माने, मा. सौ. आमृताताई व श्री. स्नेहलराव देशमुख व मा.सौ. व श्री. शंकरराव केशवराव पाटील यांचे शुभहस्ते सपत्नीक होम हवन व पुजन करण्यात आले होते. 

कारखान्याने गळीत हंगाम 2025-26 साठी 7.51 लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. त्यानुसार कारखान्याने पुर्ण तयारी केली असुन कार्यक्षेत्रातील सर्व ऊसाचे गाळप वेळेवर पुर्ण होईल. यासाठी कारखाना गाळपासाठी सज्ज झाला असुन नोव्हेंबरच्या पहील्या आठवडयात प्रत्यक्ष गाळपास सुरुवात होणार असुन या हंगामात गाळपास आलेल्या ऊसाला मांजरा परीवाराचे मार्गदर्शक सहकारमहर्षी मा.श्री. दिलीपरावजी देशमुख साहेब यांनी जाहीर केल्याप्रमाणे ऊस दर देण्यात येणार असल्याने ज्या ऊस उत्पाकदकांकडे ऊस उपलब्ध आहे त्यांनी आपला ऊस इतर विल्हेवाट न करता जास्तीत जास्त रेणा कारखान्यास गाळपास द्यावा असे अवाहन कारखान्याचे चेअरमन मा.श्री. अनंतराव देशमुख (ठाकूर), व्हा. चेअरमन मा.ॲड.श्री. प्रवीण पाटील , संचालक मंडळ व कार्यकारी संचालक श्री. बी.व्ही.मोरे यांनी केले आहे. 

यावेळी कारखान्याचे संचालक धनराज देशमुख, संग्राम माटेकर, चंद्रकांत सुर्यवंशी, तुकाराम कोल्हे, गोविंद पाटील, रणजित पाटील, तानाजी कांबळे, बालाजी हाके, तज्ञ संचालक चंद्रचुड चव्हाण, नरसिंग इंगळे, तक्रार निवारण समिती सदस्य, डॉ.उमाकांत देशमुख, कार्यलक्षी संचालक आण्णासाहेब पाटील, कार्यकारी संचालक बी.व्ही.मोरे यांच्यासह कारखान्यातील  अधिकारी व कर्मचारी व ऊस उत्पादक शेतकरी आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *