• Sun. Dec 7th, 2025

जागृती शुगर कारखान्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती- सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील

Byjantaadmin

Oct 31, 2025

जागृती शुगर कारखान्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती- सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांचे प्रतिपादन 

जागृती शुगर उस उत्पादक शेतकऱ्यांना ३१५१ भाव देणार -माजी मंत्री संस्थापक अध्यक्ष दिलीपराव देशमुख यांची घोषणा 

लातूर ;- सहकारातून आर्थिक समृद्धी साधणारे सहकार महर्षी दिलीपराव देशमुख हे दूरदृष्टीचे नेते असून या दूरदृष्टीतून जिल्ह्यात २० हजार कुटुंबांना आर्थिक क्रांति मिळालेली असून लोकनेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब यांनी राज्यात सहकार चळवळीची क्रांती घडवली त्यांचें बंधू सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांनी त्यांचे हे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न केले असून त्यांच्या दूरदृष्टीतून जागृती शुगर कारखाना गेली १४ वर्षापासून दिमाखदारपने सुरू आहे या साखर कारखान्यामुळे या भागातील शेतकऱ्यांची आर्थिक  प्रगती झाली असून एक आदर्श कारखाना म्हणून जागृति शुगरने नावलौकिक मिळवला आहे असे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी येथे बोलताना व्यक्त केले ते मंगळवारी  देवणी तालुक्यातील तळेगाव (भो) येथील जागृती शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेड या कारखान्याचा १४ वा गळीत हंगामाचा  शुभारंभ व माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या अमृत महोत्सव वर्षांच्या निमित्ताने त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी मंत्री कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष दिलीपराव देशमुख, सौ सुवर्णाताई दिलीपराव देशमुख यावेळी उपस्थीत होतें

 यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार वैजनाथराव शिंदे, माजी आमदार धर्माजी सोनकवडे, जिल्हा बँकेचे संचालक अशोक पाटील निलंगेकर, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अभय साळुंखे, राष्ट्रवादी (शरद पवार गट) प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर,  आबासाहेब पाटील, यशवंतराव पाटील, मलिकार्जुन मानकरी, डी.एन. शेळके, विजयकुमार पाटील, जिल्हा बँकेचे संचालक भगवानराव पाटील तळेगावकर, विठ्ठलराव माकने शिवाजीराव केंद्रे मल्लिकार्जुन आप्पा मानकरी, मोइजभाई शेख, जगदीश बावणे, धनंजय देशमुख, जागृती शुगर चे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे संचालक दिलीप माने संचालक सूर्यकांत करवा, गणेश येवले आदी मान्यवर उपस्थित होते.

एफ आर पी पेक्षा 70 कोटी रुपये जागृती ने उस उत्पादक शेतकऱ्यांना जादा दीले* उसाला ३१५१ रुपये भाव देणार* संस्थापक अध्यक्ष दिलीपराव देशमुख यांची माहिती

मांजरा परिवारातील जागृती शुगर ने नेहमी शेतकऱ्यांच्या मदतीला धावून अधिक दर देण्याचा प्रयत्न केला असून गेल्या १३ वर्षात एफ आर पी पेक्षा ७० कोटी रुपये अधिक रक्कम शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न केला असून सुरवातीला जागृतीचा गाळपाचा प्रवास दहा लक्ष टणापासून सुरू झालेला आज सत्तर लक्ष टन पर्यंत पोहोचलेला आहे असे सांगून ग्रण्यूअल्स खत, निर्मिती, ३२मेगावॉट सोलार प्रकल्प यावर काम सुरू आहे कारखाना भविष्यात सल्फर विरहित साखर निर्मिती करणार असल्याचे सांगून चालु गाळप हंगामात ३१५१ रुपये प्रति मेट्रिक टन  उसाला भाव देण्याची घोषणा केली 

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे उपाध्यक्ष लक्ष्मण मोरे यांनी करत त्यांनी सांगितले की, “गेल्या १३ वर्षांत कारखान्याने सुमारे ६० ते ६२ लाख मॅट्रिक टन ऊस गाळप करून शेतकऱ्यांना तब्बल १५८२ कोटी रुपये पेमेंट दिले आहे. सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या दूरदृष्टीतून परिसरातील धरणांमुळे शेतीत हरितक्रांती झाली असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे असे यावेळी सांगीतले.

मी दिलीपरावजी सोबत राहिल्यामुळे  सहकार मंत्री झालो-सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांचे प्रतिपादन

यावेळी बोलताना राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिलीपरावजीं सोबत गेली चाळीस वर्षे कार्यरत असून शेतकऱ्यांच्या विकासासाठी आम्ही एकत्र राहून काम केले त्यांचे सतत मार्गदर्शन त्यांच्या सोबतीला राहून कार्य करत गेल्याने मी राज्याचा सहकार मंत्री होवू शकलो असे सांगून भविष्यात त्यांच्यासोबत राहून कार्य करत राहू  त्यांच्या अमृत महोत्सव वर्षांच्या निमित्ताने अभिष्टचिंतन करत शुभेच्छा दिल्या.

यावेळी ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचा जागृती शुगर कारखान्याच्या वतीने शेतकरी, कामगार, वाहतूकदार आणि मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख,लातूर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव, मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष शाम भोसले रेणा साखर कारखान्याचे अध्यक्ष अनंतराव देशमुख, ट्वेंटी वन शुगर चे उपाध्यक्ष विजय देशमुख,अँड प्रवीण पाटील, सचिन पाटील , दिलीप पाटील नागराळकर राजकुमार पाटील व्यंकटराव बिरादार मारोती पांडे, जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक हणमंत जाधव,कल्याण पाटील हरिराम कुलकर्णी, यांच्यासह मांजरा परिवारातील संस्थांचे पदाधिकारी उस उत्पादक शेतकरी सभासद नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमांचे आभार प्रदर्शन जनरल मॅनेजर गणेश येवले  यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *