लक्ष्मी अर्बन बँकेच्या चेअरमपदी अशोक अग्रवाल व व्हा.चेअरमपदी सतिश भोसले
लातुर:-मराठवाड्यातील नावाजलेली,मागील 25 वर्षापासून सातत्याने व्यापारी, उद्योगपती, कष्टकरी व सर्व प्रकारच्या गरजू लोकांना आवर्जुन मदत करणारी, एक अग्रणी बँक म्हणून नावलौकिक मिळवलेली लक्ष्मी अर्बन को-ऑप.बँक लि, लातूर या बँकेच्या चेअरमनपदी अशोक (गठ्ठू सेठ)अग्रवाल यांची फेरनिवड झाली आहे, तर सतीश भोसले यांची व्हा. चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली आहे.
सन २०२३ -२८ या कालावधी साठी बँकेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. बँकेने बिनविरोध निवडणूकीची परंपरा कायम ठेवली आहे. या निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित संचालकांमधून बँकेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या निवडीची प्रक्रिया शनिवार दि. ४ मार्च २०२३ रोजी अध्यासी अधिकारी आर. एल. गडेकर यांच्या अध्यक्षतेखाली बँकेच्या सभागृहात पार पडली. ह्यावेळेस सर्व नूतन संचालकांचा सत्कार बँकेच्या कर्मचारी वर्गाकडुन करण्यात आला. बँकेचे चेअरमन अशोक अग्रवाल यांची फेरनिवड झाल्याबद्दल व व्हा. चेअरमन सतिश भोसले यांची निवड करण्यात आल्याने
त्यांचे सर्व स्तरातून स्वागत व अभिनंदन होत आहे.
संचालकांमध्ये सुर्यप्रकाश धूत, ॲड. धर्मवीर जाधव, सुरेशचंद्र जैन, लक्ष्मीकांत सोमाणी, अजितलाल आळंदकर, शशिकांत मोरलावार, विजय वर्मा, डॉ. अनिल राठी, सौ. रचना ब्रिजवासी, सौ. कमलादेवी राठी, सौ. माला भुतडा, कु. सुवर्णा पवार, गणेश हेडडा, आशिष अग्रवाल, विशाल हलवाई यांचा समावेश आहे.
यावेळी बँकेचे निवडणूक निर्णय अधिकारी आर. एल. गडेकर, प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश आळंदकर व सहकार खात्यातील कर्मचारी राम गायकवाड यांची यावेळी उपस्थिती होती.
हे पण वाचा
BIG NEWS ! बारावीच्या इंग्रजी पेपरमध्ये बोर्डाकडून चुका, विद्यार्थ्यांना मिळणार सहा गुण
BIG NEWS ! बारावीच्या इंग्रजी पेपरमध्ये बोर्डाकडून चुका, विद्यार्थ्यांना मिळणार सहा गुण