• Wed. Apr 30th, 2025

BIG NEWS ! बारावीच्या इंग्रजी पेपरमध्ये बोर्डाकडून चुका, विद्यार्थ्यांना मिळणार सहा गुण

Byjantaadmin

Mar 4, 2023

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. बारावी बोर्ड (HSC Board) परीक्षेत इंग्रजी पेपरमध्ये बोर्डाकडून झालेल्या चुकांमुळे विद्यार्थ्यांना सहा गुण मिळणार आहेत. बारावीच्या इंग्रजी पेपरमध्ये काही प्रश्नांमध्ये चुका झाल्या होत्या, त्या प्रश्नांसाठी विद्यार्थ्यांना आता सहा गुण मिळणार आहेत. बारावीच्या इंग्रजी पेपरमध्ये चुका झाल्याचं निदर्शनात आलं होतं. त्यानंतर याबाबतील बोर्डाने आता मोठा निर्णय घेतला आहे

इंग्रजी पेपरमधील चुका बोर्डाकडून मान्य

21 फेब्रुवारीला बारावीचा इंग्रजीचा पहिला पेपर होता. या इंग्रजीच्या पेपरमध्ये कविता विभागातील (Portry Section) प्रश्नांमध्ये चुका झाल्या होत्या. इंग्रजीच्या पेपरमधील तीन प्रश्नांमध्ये चुका झाल्या होत्या. या तीन प्रश्नांसाठी सहा गुण होते. आता बोर्डाने इंग्रजी पेपरमधील चुका मान्य करत विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. बोर्डाकडून विद्यार्थ्यांना ‘त्या’ तीन प्रश्नांसाठी एकूण सहा गुण देण्यात येणार आहेत.

तीन प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा

बोर्डाकडून निर्णय देत सांगितलं आहे की, बारावीच्या इंग्रजी पेपरमधील चुकलेले तीन प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेल्या विद्यार्थ्यांना सहा गुण देण्यात येतील. इंग्रजी पेपरमध्ये चुका आढळल्यानंतर त्याबाबतीत बोर्डाने अहवाल जारी करण्यास सांगितलं होतं. यामध्ये काही तज्ज्ञांची बैठक झाली. बोर्डाने दिलेल्या अहवालामध्ये इंग्रजी पेपरमध्ये चुका झाल्याचं बोर्डाने मान्य केलं आहे. तीन प्रश्नांमध्ये चुका झाल्या होत्या.

चुकीच्या प्रश्नासाठीचे सहा गुण मिळणार

बोर्डाने परिपत्रक जारी करत याबाबत माहिती दिली आहे. बोर्डाने जारी केलेल्या परिपत्रकात सांगितलं आहे की, ज्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी पेपरमधील चुकीचे तीन प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला असेल त्यांना सहा गुण देण्यात येणार आहेत.

 

प्रश्न सोडविला असेल तर मिळणार गुण

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोलापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी 2023 पासून सुरु झाली आहे. 21 फेब्रुवारी रोजी इंग्रजी विषयाची परीक्षा झाली आहे. या इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये चुका आढळल्याचं असल्याचे इंग्रजी विषयाच्या संयुक्त सभेच्या अहवालावरून निदर्शनास आलं. या अहवालानुसार चुका आढळलेल्या प्रश्नाचे गुण विद्यार्थ्यांना देण्यात येतील.

‘या’ परिस्थितीमध्येच विद्यार्थ्यांना मिळणार गुण

1. उत्तरपत्रिकेमध्ये Poetry Section-2/ Poetry / Section-2 असा उल्लेख केला असल्यास

2. विद्यार्थ्यांनी Poetry Section-2 मधील अन्य कोणतेही प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला असेल तर

3. त्रुटी असलेला प्रश्न क्रमांक (A-3, A-4, 4-5) उत्तरपत्रिकेमध्ये लिहिला असल्यास

वरील तीन पैकी कोणत्याही एका प्रकारचे विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेत लिहिले असल्यास प्रत्येक प्रश्नाचे दोन याप्रमाणे विद्यार्थ्याला एकूण सहा गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

‘कसबा तो झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है’, विधानसभेला 200 तर लोकसभेला 40 जागा जिंकू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *