• Wed. Apr 30th, 2025

‘कसबा तो झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है’, विधानसभेला 200 तर लोकसभेला 40 जागा जिंकू

Byjantaadmin

Mar 4, 2023

महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) म्हणून आम्ही एकत्र लढलो तर (Kasba) निकाल लागतो आणि थोड जर इकडं तिकडं झालं तर चिंचवडप्रमाणे निकाल लागतो. हा दोन्ही ठिकाणच्या मतदारांनी दिलेला धडा असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार (ठाकरे गट) (Sanjay Raut) यांनी केलं. कसब्याचा निकाल हा महाराष्ट्राच्या राजकीय भविष्यासाठी मार्गदर्शक आहे. 2024 पर्यंत महाविकास आघाडीने मजबुतीने एकत्रितपणे काम केलं तर विधानसभेत 200 पेक्षा जास्त जागा निवडून येतील. तसेच लोकसभेला 40 जागा निवडून येतील असा विश्वास SANJAY RAUT  व्यक्त केला.

चिंचवडचा विजय भाजपचा नाही, तो विजय जगताप पॅटर्नचा

चिंचवडमध्ये आमच्याकडून काही बाबतीत चूक झाली. चिंचवडचा विजय हा भाजपचा विजय आहे, हे कोणीच मानणार नाही. चिंचवडमध्ये अनेक वर्षांपासून जगताप पॅटर्न चालतो. हा विजय जगताप पॅटर्नचा असल्याचे संजय राऊत म्हणाले. जर उमेदवार निवडताना अधिकची काळजी आम्ही घेतली असती किंवा राहुल कलाटेंनी माघार घेतली असती तर महाविकास आघाडीचा विजय निश्चित होता असेही राऊत म्हणाले.

40 आमदारांनी आधी स्वत:चं अंतरंग तपासावं

शिंदे गटाच्या आमदारांच्या मागणीप्रमाणे अटक होणार असेल तर होऊन जाऊ द्या अटक. कायदा, न्यायालय, पोलीस अजून खोक्याखाली चिरडले नाहीत. अजूनही रामशास्त्री जिवंत असल्याचे राऊत म्हणाले. या 40 आमदारांनी आधी स्वत:चं अंतरंग तपासावं असा टोलाही राऊतांनी लगावला. मी विधीमंडळाचा पूर्ण आदर करतो. माझं वक्तव्य हे विशिष्ट फुटीर गटापुरतं होतं.  विधीमंडळाचा मी अपमान करणार नाही. कारण मी त्या सभागृहाचा सदस्य असल्याचे राऊत म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *