• Wed. Apr 30th, 2025

कोल्हापुरातही This is Dhangekar म्हणत बॅनरबाजी; Who is धंगेकर म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना पुन्हा डिवचले!

Byjantaadmin

Mar 4, 2023

(Ravindra Dhangekar) यांनी भाजपच्या हेमंत रासने यांना पराभवाची धुळ चारली. या पराभवावरुन भाजपवर टीका होत असतानाच उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावरही टीका होत आहे. ऐन प्रचारात त्यांनी Who Is Dhangekar असा उल्लेख करत धंगेकरांना कमी लेखण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे हाच धागा पकडून आता पुण्यामध्ये This is Dhangekar बॅनर लागले आहेत. आता त्याच पद्धतीने  KOLHAPUR लावून चंद्रकांत पाटील यांना डिवचण्यात आलं आहे. शहरातील कावळा नाका चौक परिसरात This is Dhangekar म्हणत महाविकास आघाडीकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे.

दुसऱ्याला मात्र खालच्या पातळीवर बोलतात 

This is Dhangekar banner also in kolhapur after pune as bjp loss in kasaba bypoll election Chandrakant Patil : कोल्हापुरातही This is Dhangekar म्हणत बॅनरबाजी; Who is धंगेकर म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना पुन्हा डिवचले! 

 

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रचारामध्ये सर्वसामान्य घरातील असलेल्या धंगेकर यांचा अपमानास्पद उल्लेख केला होता. म्हणूनच हे होर्डिंग लावल्याचे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे म्हणणं आहे. स्वतःला गिरणी कामगाराचा मुलगा म्हणून घेतात आणि दुसऱ्याला मात्र खालच्या पातळीवर बोलतात, अशी टीकाही त्यांनी केली. 2024 मध्येही अशाच पद्धतीचे चित्र पाहायला मिळेल, असं महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.

भाजपने कसब्यातून रवींद्र धंगेकरांना पराभूत करण्यासाठी सर्वस्व पणाला लावले होते. रोड शो, प्रचारसभा, कोपरा सभा घेतल्या होत्या. त्याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील मैदानात उतरले होते. मुख्यमंत्र्यांनी रोड शो केला होता. या प्रचारादरम्यान चंद्रकांत पाटलांनी प्रचार सभेत रवींद्र धंगेकरांवर टीका केली होती. भरसभेत हू इज धंगेकर, तो आमच्यासमोर टिकू शकत नाही असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर धंगेकरांचे समर्थक पेटून उटले होते. त्यांनी सगळ्या कसब्यात पुणेरी पाट्या लावल्या. विजयानंतर त्यांनी कविताही व्हायरल करुन चंद्रकात पाटलांना उत्तर दिलं. धंगेकर नाऊ MLA असं आता सगळीकडे व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेली कविता

Who is dhangekar?
ज्याने पाडला गणेश बिडकर,
केला गड सर,
Who is dhangekar?
ज्याने वाटायला लावले,
चांदीच्या विटा, सोन्याचे डॉलर,
Who is dhangekar?
प्रचाराला लावले RSS चे केडर,
भले-भले मोठे बिल्डर,
Who is dhangekar?
देशाचे नेते फिरवले गल्लीभर,
धास्तीने जागेच रात्रभर,
Who is dhangekar?
ज्याने अश्रू आणले ओठांवर,
बंगल्याचे ओझे पेठांवर,
Who is dhangekar?
ज्याने आठवायला लावले पुण्येश्वर,
नदीत उतरून पहाय लावले ओंकारेश्वर,
Who is dhangekar?
जबरदस्तीने पैसे वाटतो हरिहर,
नाकारता हात उचलतो आया-बहिणींवर,
Who is dhangekar?
घाम फुटलाय ज्याच्या धाकावर,
ज्याने खोबऱ्याचे तेल आणलय कपाळावर, नाकावर.
कळले का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *