• Tue. Apr 29th, 2025

इंडोनेशिया येथील प्रतिनिधींकडून विलास सहकारी साखर कारखान्याच्या वाटचालीचे कौतूक

Byjantaadmin

Feb 26, 2023

इंडोनेशिया येथील प्रतिनिधींकडून विलास सहकारी साखर कारखान्याच्या वाटचालीचे कौतूक

लातूर प्रतिनिधी : विलास सहकारी साखर कारखान्यास आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान देवाण घेवाण उपक्रमांतर्गत इंडोनेशिया येथील प्रतिनिधीच्या पथकाने भेट देवून कारखान्याच्या वाटचालीचे कौतूक केले आहे. आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान देवाण घेवाण उपक्रमांतर्गत इंडोनेशिया येथील पथकात ऊस शेती व साखर उद्योगातील तज्ञ घिमोयो (सीईओ, जॉनलीन ग्रुप) फ्रान्सीस्को वर्नीलिम यांचा समावेश होता.  विलासराव देशमुख यांची प्रेरणा, माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख  यांचे मार्गदर्शन व संस्थापक चेअरमन माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख , लातूर रामिणचे आमदार धिरज विलासराव देशमुख, चेअरमन वैशाली विलासराव देशमुख  यांचे नेतृत्वाखाली विलास सहकारी साखर कारखाना प्रारंभीपासून यशस्वी वाटचाल करीत आहे. विलास कारखान्याने ऊस विकास, एकरी ऊसाची उत्पादकता, पाणी व्यवस्थापन, ऊस तोडणी यांत्रीकीकरणासाठी केलेले काम यासाठी महत्वाचे ठरले आहे. विशेषत: ठिबक सिंचन, माती परिक्षणावर आधारीत खत वापर, पथदर्शक ऊस लागवड, ऊसरोपे व सुधारीत वाणाचे बेणे वापरातील सातत्य, कृषी विभागातील कर्मचारी व उस उत्पादक शेतकरी यांना वेळोवळी दिलेले प्रशिक्षण,  मुख्य व सुक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खताच्या वापरावर भर, ऊस तोडणी यंत्रे तसेच ऊस शेतीतील
यांत्रीकीकरणासाठी विशेष तरतूद केली आहे. याबाबत सविस्तर माहिती पथकाने घेतली. तसेच विलास कारखान्याकडून ऊस शेती व तोंडणी यांत्रीकीकरण योजना, कृषी
अवजारांचा पुरवठा योजना, एकात्मिक खत व्यवस्थापन, ऊस संपर्क अभियान, ऊस पीक स्पर्धा, पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपन कारखान्याच्या या सर्व ऊस विकासाच्या योजना सभासद, ऊस उत्पादक हिताच्या कल्याणकारी योजना असून सर्व कारखान्यासाठी योजना पथदर्शी ठरल्या आहेत. कारखान्याचे हे सर्व उपक्रम ऊस विकास आणि संवर्धनासाठी अनुकरणीय ठरले आहेत. सदरील उपक्रमाची पथकाने सविस्तर माहीती घेवून कारखाना उपक्रमाचे कौतूक करून ऊस शेतीबाबत राबविलेल्या योजना अनुकरणीय असल्याबाबतचे
गौरवोद्गार काढले. तसेच या भेटीत त्यांनी कारखान्याची अंतर्गत व बाहय स्वच्छता, पर्यावरण संवर्धनासाठी केलेले काम, काखान्याच्या गाळप क्षमतेचा वापर, साखर निर्मितीतील उत्पादन खर्च कमी करणे, पाण्याचा पुनर्वापर, अद्ययावत संगणकीकरण, आदी घटकासोबत प्रशासन व दैनंदिन कामकाजाचीही पाहणी करून कारखाना वाटचालीचे कौतूक केले.
पाहणीस आलेल्या पथकाने ऊस शेती, प्रति हेक्टरी ऊस उत्पादन, साखर उतारा, ऊस जाती , भौगोलिक परिस्थिती, इंडोनेशिया येथील साखर कारखानदारी व भारतातील साखर
कारखानदारीच्या परिस्थितीची तुलनात्मक पाहणी केली. विलास कारखान्यातर्फे ऊस विकास, ऊस शेती यांत्रिकीकरण, पर्यावरण व्यवस्थापन, उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता, उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन इत्यादी बाबत राबविण्यात येत असलेले उपक्रम पाहून प्रतिनिधी प्रभावीत झाले. कारखाना वाटचाली संदर्भात व्हा.चेअरमन रविंद्र काळे व कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी माहिती दिली. कारखान्याच्या वतीने पथकातील प्रतिनिधींचे रविंद्र काळे, व्हा.चेअरमन व संजीव देसाई, कार्यकारी संचालक यांनी स्वागत केले. यावेळी मुख्य शेतकी अधिकारी एस.एस.कल्याणकर, ऊस विकास अधिकारी सी.एम.जहागीरदार, इतर सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख व कर्मचारी,उप‍स्थित होते.

राहुल गांधी म्हणाले- भारत जोडो यात्रेतून खूप काही शिकलो, शेतकऱ्यांच्या वेदना जवळून समजून घेतल्या

https://www.youtube.com/watch?v=0uFo1vHNXno

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed