जिल्हा परिषद जेवरी शाळा रीड टू मी वापरात जिल्ह्यात विध्यार्थासह प्रथम
Nilanga निलंगा तालुक्यातील जि प प्रा शा जेवरी शाळेने रीड टू मी या अँपच्या माध्यमातून इंग्रजी या विषयाचा अभ्यासक्रम समजून घेणे व पूर्ण करणे यासाठी याचा उपयोग होतो .संपूर्ण महाराष्ट्रात90 हजार शाळांसाठी 6वी ते10वीच्या विध्यार्त्यासाठी व्हिडीओ बनवून अपलोड करण्याची स्पर्धा घेण्यात आली होती. याचे परीक्षण जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्या वतीने करण्यात आले होते. लातुर जिल्ह्यात सर्वात जास्त व्हिडीओ हे6वी व 7वी च्या50 पैकी44 विध्यार्थानी बनवले होते. व 1ली ते 7वी च्या एकूण169 विद्यार्थ्यापैकी130 विध्यार्थी रीड टू मी या अँपचा वापर करतात. व महाराष्ट्रातील प्रायमरी शाळेतील ही एकमेव शाळा असल्याचे तपासणी अंती आढळून आले व शाळेला सन्माचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन मुख्याध्यापक तांबोळी एस एस,केंद्र प्रमुख विलास सुर्यवंशी व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष शेख हाजीमलंग व सरपंच कल्पना सुर्यवंशी व सर्व स्टाफ यांचा सत्कार करण्यात आला. तसेच इयत्ता6वी मध्ये साक्षी रतन कांबळे हिचा जिल्ह्यात व्हिडीओ पहिला आला व तिला एक मेडल ,सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन डायटचे प्राचार्य राजेंद्र गिरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व 7वी मधील गणेश ज्ञानोबा खोमणे याचाही व्हिडीओ जिह्यात प्रथम आल्याने त्याचाही एक मेडल, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन जेष्ठअधिव्याखाते विजयकुमार सायगुंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी डॉराजेंद्र गिरी प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मुरुड, विजयकुमार सायगुंडे जेष्ठअधिव्याखाते, संजय पवार इंग्रजी तज्ञ, हिपळगावे मलिकार्जुन रीड टू मी राज्यसमनव्यक यांनी विध्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक जाधव एम एम यांनी केले तर सूत्रसंचालन श्रेया इंगळे व हर्षधा क्षीरसागर या मुलींनी केले. रीड टू मी या उपक्रमाला विशेष मार्गदर्शन इंग्रजी विषयाचे कलशेट्टी पी एस यांचे लाभले. कार्यक्रमाचे आभार फुलारी के आर यांनी मानले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिवराज सूर्यवंशी, देशमुख व्ही बी डोंगरे ए टी, आरदवाड डी जी यांनी परिश्रम घेतले
https://jantaexpress.co.in/?p=4285
https://www.youtube.com/watch?v=eGMWPGgNheo