• Tue. Apr 29th, 2025

जागृती शुगर चे चालु हंगामात ५ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप १ कोटी ७२ लाख ८०० युनिट वीज केली निर्यात

Byjantaadmin

Feb 26, 2023
जागृती शुगर चे चालु हंगामात ५ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप १ कोटी ७२ लाख ८०० युनिट वीज केली निर्यात
लातूर ;.शेतकऱ्यांची आर्थिक क्रांती घडवून आणलेल्या महाराष्ट्र- कर्नाटक-  आंध्र या तिन्ही राज्याच्या सीमेवर असलेल्या महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील तळेगाव येथील जागृती शुगर कारखान्याने चालु गाळप हंगामात ११० दिवसात ५ लाख मेट्रिक टन उसाचे विक्रमी गाळप करुन  त्यातून ४ लाख ९० हजार ६५० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे तर को जनरेशन च्या माध्यमातून १ कोटी ७२ लाख ८०० युनिट वीज निर्मिती करून निर्यात केली आहे मागच्या दहा वर्षापूर्वी चे सर्व गाळपाचे रेकॉर्ड मोडून यावर्षी जागृती शुगर ने कमी दिवसांत जास्तीचे गाळप करून वेगळा नवीन विक्रम केला आहे राज्याचे माजी मंत्री जागृती शुगर चे संस्थापक अध्यक्ष दिलीपराव देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्यांच्या अध्यक्षा सौ गौरवीताई अतुल भोसले (देशमुख) यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या जागृती शुगर ने कारखान्याच्या प्रगती बरोबर उस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता देण्याबरोबरच  मराठवाडा विदर्भ राज्यात एफ आर पी पेक्षा अधिक भाव देणाऱ्या यादीत जागृती शुगर अव्वल स्थानावर राहिलेला आहे
देवणी तालुक्यातील तळेगाव येथील जागृती शुगर साखर कारखान्याने चालु गाळप हंगामात कमी दिवसात अधिक गाळप करून उस उत्पादक शेतकऱ्यांना २२०० रुपये मेट्रिक टन याप्रमाणे पहिला हप्ता त्यांच्या खात्यावर जमा दिलेला आहे साखर कारखान्याने चालु हंगामात  उसाचे गाळप करण्यासाठी पारदर्शकता ठेवून अचूक कामगिरी केली असून नोंदणी प्रमाणे ऊसाचे गाळप सुरू असल्याची माहिती जागृति शुगर चे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे यांनी दिली आहे
ऊसाचे गाळप अंतीम टप्प्यात
चालु हंगाम अंतिम टप्प्यात असून शेतकऱ्यांच्या नोंदणी प्रमाणे ऊसाचे गाळप करण्यात येत असून उस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणी प्रमाणे ऊस तोडणी सुरू आहे यावर्षी जास्तीत जास्त उसाचे गाळप करण्याचा प्रयत्न जागृती शुगर कारखाना प्रयत्न करणार असल्याचे कारखान्याचे सरव्यवस्थापक गणेश येवले यांनी सांगितले
https://www.youtube.com/watch?v=AqxXREpK2VQ
https://jantaexpress.co.in/?p=4278

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed