शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या हस्ते कुमारी तनवी व्यंकटराव कुंभार जवाहर नवोदय विद्यालय या विद्यार्थिनीचा सत्कार
निलंगा:- जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या हस्ते मौजे मदनसुरी तालुका निलंगा जिल्हा लातूर येथील वेंकट रामराव कुंभार यांची कन्या जवाहर नवोदय विद्यालय लातूर येथे शिक्षण घेत असून कुमारी तनवी व्यंकट कुंभार हिने खो खो स्पर्धेमध्ये तालुका लेवल जिल्हा लेवल अत्यंत चांगला खो खो खेळल्यामुळे तिची निवड टीमच्या कॅप्टन पदी झाली. आणि महाराष्ट्र ओडिसा येथे झालेल्या खो खो स्पर्धेमध्ये अत्यंत चांगली कामगिरी केली अशी ही मुलगी मदनसुरी गावांमध्ये जन्म घेऊन एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेली आहे .आणि तिने मदनसुरी गावचे नाव लातूर जिल्ह्यामध्ये नाही महाराष्ट्रामध्ये देशामध्ये उत्कृष्ट कामगिरी करून गाजवलेला आहे. याबद्दल मला निश्चितच आनंद होत आहे. कुठल्या क्षेत्रात कुणी कामगिरी करावं याबद्दल ज्यांच्या त्याच्या अंगातली सूक्तगुण हे सगळं घडवून आणतात .आणि असेच ग्रामीण भागातले कित्येक खेळाडू राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेले आहेत. कुठल्याही प्रकारचं खेळाचं वातावरण घरात नसताना आई-वडील आपला उदरनिर्वाह भागवण्यासाठी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये जीवन जगतात आणि त्या जोडप्याच्या पोटी तनवी सारखे मुलगी जन्माला येते आणि संपूर्ण खानदानी चे नाव रोशन करते ही अत्यंत महत्त्वाची बाब असून निश्चितच ग्रामीण भागातील मुलींनी तनवीचा आदर्श घ्यावा. असं काम तनवीने केलेल आहे. तिच्या पुढील खेळासाठी शिक्षणासाठी शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांच्या वतीने शिवसेनेचा जिल्हाप्रमुख म्हणून मी मनस्वी हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा देतो व तिचे खूप खूप अभिनंदन करतो असे उद्गार शिवसेना जिल्हाप्रमुख यांनी काढले. यावेळी मदनसूरी माजी सरपंच अशोक जाधव, मधुकर दाजी धोंडीराम जाधव नाना ग्रामपंचायत सदस्य अशोक भाऊ सूर्यवंशी, दिलीप जाधव, माधव शिंदे ,गुलाब माने, गोविंद दुकानदार ,माधव जाधव ,सचिन जाधव, महेश जाधव ,राहुल माने ,निखिल शिंदे ,आकाश शिंदे, संजय शिंदे, गोरोबा राजे ,विजय पांचाळ ,राम माने ,काशिनाथ सूर्यवंशी ,प्रदीप माने, संजय जाधव महेश कोतापुरे शहाजी माने, प्रणित संभाजी माने, असे अनेक जण उपस्थित होते.
