छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये काँग्रेसच्या 85व्या अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. 3 प्रस्तावांवर चर्चा होणार आहे. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे दुपारी दोन वाजता संबोधित करतील. सध्या राहुल गांधी अधिवेशनाला संबोधित करत आहेत. भारत जोडो यात्रेतील अनुभवांनी त्यांनी भाषणाची सुरुवात केली.
1. जेव्हा गळाभेट घ्यायचो तेव्हा ट्रान्समिशनसारखे व्हायचे
राहुल म्हणाले- आम्ही कन्याकुमारी ते श्रीनगर अशी चार महिने भारत जोडो यात्रा केली. तुम्ही व्हिडिओमध्ये माझा चेहरा पाहिला, पण लाखो लोक आमच्यासोबत चालले. आम्ही पाऊस, गरमी आणि बर्फात एकत्र चाललो. खूप काही शिकायला मिळाले. पंजाबमध्ये एक मेकॅनिक येऊन मला भेटला हे तुम्ही पाहिले असेल. मी त्याचा हात धरला आणि मी त्याची वर्षांची तपश्चर्या, त्याची वेदना आणि दु:ख ओळखले.
लाखो शेतकर्यांशी हस्तांदोलन करायचो, मिठी मारली की लगेच एक ट्रान्समिशन व्हायचे. सुरुवातीला तुम्ही काय करता, तुम्हाला किती मुले आहेत, अडचणी काय आहेत यावर बोलण्याची गरज होती. हा प्रकार दीड महिना चालला आणि त्यानंतर काही बोलायची गरज नव्हती. हात धरून, मिठी मारताच त्यांची वेदना एका सेकंदात समजत होती. काही न बोलता मला काय बोलायचे ते त्यांना समजून यायचे.

2. यात्रा सुरु केली तेव्हा जुने दुखणे सुरु झाले
राहुल गांधी म्हणाले, ‘तुम्ही बोटीची शर्यत पाहिली असेल. मी बोटीत बसलो होतो. माझ्या पायात तीव्र वेदना होत होत्या. त्या फोटोत मी हसत होतो, पण मनातल्या मनात रडत होतो. मी यात्रा सुरू केली. मी एक तंदुरुस्त माणूस आहे. 10-12 किलोमीटर सहज धावतो. 20-25 किमी चालण्यात काय मोठी गोष्ट आहे याचा अहंकार होता.
ही जुनी जखम होती. कॉलेजमध्ये फुटबॉल खेळताना दुखापत झाली होती. मी धावत होतो, तेव्हा जखम झाली. ती वेदना नाहीशी झाली होती. मी यात्रा सुरू करताच, वेदना परत आली. तुम्ही माझे कुटुंब आहात त्यामुळे मी तुम्हाला सांगू शकतो की, मी सकाळी उठल्यानंतर विचार करायचो की, आता चालायचे कसे. त्यानंतर विचार यायचा 25 किलोमीटर नाही तर 3 हजार 500 किलोमीटर चालायचे आहे, कसे चालणार?
मग कंटेनरमधून खाली उतरून चालणे सुरु करत होतो. लोकांना भेटायचो. पहिल्या 10-15 दिवसांत अहंकार आणि गर्व नाहीसा झाला. कारण भारत मातेने संदेश दिला होता की, तू कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत चालण्यासाठी निघाला आहेस तर हृदयातून अहंकार काढून टाक. नाहीतर चालू नका. मला हे ऐकावे लागले. ते न ऐकण्याची ताकद माझ्यात नव्हती.’

3. आजपर्यंत माझ्याकडे घर नाही
राहुल म्हणाले, ‘हळूहळू माझा आवाज शांत झाल्याचे माझ्या लक्षात आले. जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचल्यावर पूर्णपणे नि:शब्द झालो. मेडिटेशन करताना होतो तास गप्प झालो. आई बसली आहे. मी लहान असताना 1977 ची गोष्ट होते. निवडणूक आली, मला त्यावेळी काही माहिती नव्हते. घरात विचित्र वातावरण होते. मी आईला विचारले काय झाले मम्मी. आई म्हणाली आपण घर सोडत आहोत.
तोपर्यंत मला घर आपल वाटत होतं. मी आईला विचारले की आपण घर का सोडतोय? आईने मला पहिल्यांदा सांगितले की, हे आपले घर नाही. हे सरकारचे घर आहे. आता इथून निघायचे आहे. मी कुठे जायचे असे विचारल्यावर ती म्हणाली, कुठे जायचे ते माहित नाही. मी आश्चर्यचकित झालो. मला वाटलं ते आमचं घर आहे. 52 वर्षे झाली माझ्याकडे घर नाही. आजपर्यंत नाही.’
माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शनिवारी छत्तीसगडच्या 85 व्या काँग्रेस अधिवेशनात भावुक होत राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत देऊन सर्वांनाच चकित केले. सोनिया म्हणाल्या, सन 2004 आणि 2009 मध्ये पक्षाची कामगिरी असो अथवा मनमोहनसिंग यांना पंतप्रधान बनवण्याचा निर्णय. या दोन्ही गोष्टी वैयक्तिकदृष्ट्या मला अत्यंत समाधान देणाऱ्या ठरल्या. आता ‘भारत जोडो’ यात्रेने माझा डाव संपुष्टात येत आहे याचा सर्वाधिक आनंद वाटतोय.
मल्लिकार्जुन खरगे म्हणाले – देशात द्वेषाचे वातावरण आहे. सरकार रेल्वे, जेल, तेल सर्वकाही आपल्या मित्रांना विकत आहे. दिल्ली सरकारमध्ये बसलेल्या लोकांचा DNA गरीब विरोधी आहे.
काँग्रेसची घटना बदलण्यात आली. त्यापैकी प्रमुख काही गोष्टी…
- AICC प्रतिनिधी आणि सर्व पदांपैकी 50 टक्के पदे अनुसूचित जाती, आदिवासी, अल्पसंख्याक आणि मागासवर्गीयांसाठी राखीव असतील.
- 50 टक्के पदे 50 वर्षांखालील व्यक्तींकडे असतील.
- 1 जानेवारी 2025 पासून काँग्रेसमध्ये पेपर मेंबरशिप नसेल, फक्त डिजिटल सदस्यत्व असेल.
- काँग्रेसच्या फॉर्ममध्ये थर्ड जेंडरची चर्चा होणार, आता फॉर्ममध्ये आई आणि पत्नीचेही नाव लिहिले जाणार आहे.
- ब्लॉक, जिल्हा आणि राज्य पातळीवर जिथे जिथे काँग्रेसचे निवडून आलेले सदस्य आहेत. ते सर्व प्रतिनिधी असतील.
- सदस्यत्वापासून सक्षमीकरणापर्यंत आता 6 PCC प्रतिनिधी सदस्यांवर एक AICC सदस्य निवडला जाईल. आतापर्यंत 8 जणांवर निवड केली जात होती.
- AICC सदस्यांची संख्या 1240 वरून 1653 पर्यंत वाढेल.