• Tue. Apr 29th, 2025

“अजितदादा, माझ्या नादी लागू नका, नाहीतर…”, नारायण राणेंचा थेट इशारा!

Byjantaadmin

Feb 26, 2023

कीकडे पुण्याची पोटनिवडणूक (Kasaba Bypoll Election) शिगेला पोहोचली असताना शिवसेना फोडणाऱ्यांचा पराभव झाला, असा निशाणा  ajit pawarयांनी नारायण राणे (Nanaryan Rane) यांच्यावर साधला होता. त्यावर आता नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलंय. नारायण राणे यांनी कोल्हापूरमध्ये (Kolhapur News) पत्रकारांशी बोलत असताना अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले नारायण राणे ?

दुसऱ्यांच्या पर्सनल गोष्टींमध्ये मी का तोंड घालावं काही जणांना कायम तोंड घालण्याची सवय असते. त्यांच्या दोघात जे काही बोलणं झालं त्यात मला पडायचं नाही, असं नारायण राणे म्हणाले आहेत. मी काही ज्योतिषी नाही कोणता पक्ष कधी संपणार आहे हे सांगायला. जे पक्ष देशासाठी चांगलं काम करतात ते परत परत निवडून येतात आणि जे करत नाही ते इतिहास जमा होतात, असं म्हणत त्यांनी udhav thakre  यांना टोला लगावला आहे.

अजित पवार यांना थेट इशारा 

अजितदादांला कितपत राजकारण बारामतीच्या बाहेर कळतं हे मला माहित नाही आणि मला बोलायची गरज नाही. अजितदादांनी बारामतीच्या बाहेर दुसऱ्यांचं बारसं (नाव ठेवायला) करायला जाऊ नये
अजित पवारांनी माझ्या फद्यात पडू नये नाहीतर पुण्यात जाऊन त्यांचे मी बारा वाजवेन, असा थेट इशारा नारायण राणे यांनी अजित पवार (Nanaryan Rane On Ajit Pawar) यांना दिला आहे.

उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र 

माझं पहिलं कार्यक्षेत्र हे मुंबई मात्र बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी मला कोकणात पाठवलं आणि तरीही मी सहा वेळा निवडून आलो. महिला असो किंवा पुरुष उमेदवार असो. ठाकरे गट सगळेच मी केलं म्हणतात. उद्या समुद्र देखील मिच केलं असे उद्धव ठाकरे म्हणतील.

दरम्यान, केंद्रानं सही करून नोटीस कधी काढली आणि ते कोणाच्या राजवटीमध्ये काढले हे पाहणं महत्त्वाचं आहे. उद्धव ठाकरेंने काय केलं हेच कळत नाही उगा काही पण बोलायचं. उद्धव ठाकरे यांना मराठी भाषेतील विशेषण देखील योग्य ठिकाणी वापरता येत नाही, असा टोला देखील नारायण राणे यांनी यावेळी लगावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed