कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज (26 फेब्रुवारी) मतदान होत आहे. भाजप आणि महाविकास आघाडीसाठी ही निवडणूक चांगलीच प्रतिष्ठेची झाली आहे. सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली असताना मतदानाची टक्केवारी कमी झाल्याची चर्चा आहे. असे असतानाच मतदानाचा हक्क बजावण्यासाठी एक मुलगी थेट लंडनहून पुण्यात आली आहे. अमृता देवकर असे या तरुणीचे नाव आहे.
मतदान हा आपला हक्क आणि अधिकारआहे. सगळ्यांनी मतदान केले पाहिजे, या विचाराने तरुणीने पुणे गाठल्यानंतर तरूणीचे सर्वत्र कौतुक होत आहे. अशी भूमिका पुढे घेऊन जात अमृताने थेट लंडनहून थेट पुणे गाठलं आहे. १२ तासांहून अधिक प्रवास करून आलेल्या अमृताने पुण्यात येताच थेट मतदान केंद्र गाठलं आणि मतदानाचा हक्क बजावला.
अमृताने सांगितले की, मध्यरात्री दिड वाजता मी मुंबईत पोहचले. ३ वाजता मुंबईतून पुण्यात यायला निघाले. आठ वाजेपर्यंत पुण्यात पोहचले. त्यानंतर थोडा आराम केला आणि मतदान करण्यासाठी आले. मला मतदानाचा हक्क सोडायचा नव्हता. मतदानाचा हक्क बजावायचा, ही पहिली भावना होती.