पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी सकाळी कसब्यात मतदान केले. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना मतदान करतानाचा ईव्हीएम (EVM) मशीनचा फोटो आपल्या फेसबुक पेजवर अपलोड केला आहे. आता तो फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे नवा वाद उभवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
रुपाली पाटील ठोंबरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, शुभ सकाळ. कसब्याचा नव्या पर्वाची, कामाची सुरवात. आपला माणूस, कामाचा माणूस. कसबा मतदारांचा… असा उल्लेख त्यात आहे. त्यामुळे नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.
https://www.facebook.com/photo.php?fbid=746308676865875&set=a.534226818074063&type=3
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज चुरशीने मतदान होत आहे. काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर, तर भाजपकडून हेमंत रासने अशी लढत कसब्यात होत आहे. कसब्याची पोटनिवडणूक पहिल्यापासूनच चर्चेत आहे. आज त्यात रुपाली पाटील यांच्या मतदान केंद्रातील फोटोमुळे भर पडली आहे. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार धंगेकर यांना मतदान करतानाचा फोटो सोशल माडियावर शेअर केला आहे. त्यात कसब्यात पुन्हा नवा वाद उद्भवण्याची चिन्हे आहेत.
रुपाली पाटील यांनी मतदान करतानाचा ईव्हीएम मशीनचा फोटो काढून तो आपल्या फेसबुकवर शेअर केल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मतदान गुप्त असताना रुपाली पाटलांनी ते उघड का केले. पाटील यांना मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्याची परवानगी कशी देण्यात आली, असे प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्याचबरोबर निवडणूक आयोग या प्रकरणाची दखल घेऊन त्यांच्यावर काय कारवाई होत का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो आहे.
रुपाली पाटील या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या आणि पूर्वाश्रमीच्या मनसेच्या शहराध्यक्षा राहिलेल्या आहेत. तसेच, धंगेकर हेही पूर्वी मनसेत होते. त्यामुळे आपल्या पूर्वाश्रमीच्या सहकाऱ्याला उघडपणे मतदान करतानाचा फोटो रुपाली पाटील ठोंबरे यांनी शेअर केला आहे.
राहुल गांधी म्हणाले- भारत जोडो यात्रेतून खूप काही शिकलो, शेतकऱ्यांच्या वेदना जवळून समजून घेतल्या