यपूर येथे सुरू असलेल्या काॅंग्रेस अधिवेशनात माजीमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली. देशात काॅंग्रेसने ७० वर्ष लोकशाहीच्या सर्व स्तभांची स्वायत्ता अबाधित ठेवली. पण गेल्या काही काळापासून ती कुमकूवत झाली असल्याचे ते म्हणाले.
अशोक चव्हाण यांनी देशातील परिस्थितीचे वर्णन करतांना सांगितले की, खासदार rahul gandhi यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून द्वेषाच्या वातावरणाविरोधात संदेश दिला. त्यांच्या या भूमिकेला प्रचंड समर्थन लाभले. केवळ काँग्रेसच नव्हे तर इतर राजकीय पक्ष आणि सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानातील तत्वानुसार काँग्रेसने ७० वर्ष लोकशाहीच्या सर्व स्तंभांना स्वायत्त ठेवले. पण मागील काही काळापासून त्यांना कमकुवत केले जाते आहे. आयुर्विमा महामंडळ, स्टेट बॅंक ऑफ इंडिया आणि शेयर मार्केटमध्ये देशातील नागरिकांनी गुंतवलेले कोट्यवधी रूपये बुडतात. पण त्याची साधी चौकशी होत नाही, हे चिंताजनक आहे.
देशाची सुरक्षा, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांचे अधिकार, सौहार्दावरील संकट, महागाई, बेरोजगारी आदी महत्त्वाच्या मुद्यांवर संसदेत चर्चा होऊ दिली जात नाही. वास्तव सांगणाऱ्या विरोधी पक्षाच्या खासदारांना रोखले जाते. त्यांची वक्तव्ये कामकाजातून काढली जातात.
सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयात केंद्र सरकारचा हस्तक्षेप वाढला. न्यायमुर्ती सुद्धा स्वतःला सुरक्षित समजत नाहीत. न्यायालये ही शेवटची आशा असते. तिथेही न्याय मिळणार नसेल तर लोकांनी जायचे तरी कुठे? असा सवाल देखील अशोक चव्हाण यांनी केला.
राहुल गांधी म्हणाले- भारत जोडो यात्रेतून खूप काही शिकलो, शेतकऱ्यांच्या वेदना जवळून समजून घेतल्या