• Wed. Oct 15th, 2025

औराद शहाजानी येथे होणार भव्य ‘शेतकरी भवन’ कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपक्रम 

Byjantaadmin

Oct 15, 2025

औराद शहाजानी येथे होणार भव्य ‘शेतकरी भवन’ कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपक्रम 

माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे प्रयन्त

……….

औरादशहाजानी : कृषी उत्पन्न बाजार औरादशहाजानी येथे नवीन शेतकरी भवन बांधकाम करण्यासाठी राज्य शासनाने नुकतीच मंजूरी दिली असून माजीमंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रयत्नाने मंंजूरी मिळाली आहे. या शेतकरी भवनासाठी 1 कोटी 52 लाख रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत माल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना मुक्कामाची सोय व्हावी व शेतकऱ्यांना मुलभूत सुविधा देखील त्याच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीने औरादशहाजानी ता. निलंगा येथे शेतकरी भवन उभारण्यासाठीच्या सूचना माजीमंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केल्या होत्या त्यानुषंगाने 

संचालक मंडळाने सभापती नरसिंग बिरादार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन शेतकरी भवन उभारण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करून त्याबाबतचा प्रस्ताव पणन विभागाकडे पाठवण्यात आला होता. याबाबत माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यानी पाठपुरावा करून कृषी उत्पन्न बाजार समिती औराद शहाजानी येथे भव्य शेतकरी भवन मंजूर करून घेतले असून त्याबाबतची प्रशासकीय मंजूरी सोमवारी ता. 13 आक्टोबर रोजी मिळाली असून यासाठी निधीची तरतूदही करण्यात आली आहे. हे शेतकरी भवन उभारण्यासाठी एक कोटी 52 लाख 71 हजार 247 इतक्या रकमेच्या अंदाज पत्रकास शासनाने नुकतीच मंजुरी दिली आहे. एक वर्षाच्या आत हे काम पूर्ण केले जाणार असून औरादशहाजानी बाजार समिती कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांची गैरसोय यानित्ताने टळणार आहे. शिवाय औरादशहाजानी येथील वैभवात भर पडणार आहे. 

……

……….

संचालक मंडळाकडून अभिनंदनाचा ठराव

…….

औरादशहाजानी येथे कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी भवन उभारण्याचा शासन निर्णय सोमवारी दि. 13 आक्टोबर रोजी प्राप्त झाला. मंगळवारी ता. 14 आक्टोबर रोजी संचालक मंडळाची नियोजित बैठक होती यावेळी संचालक संजय दोरवे यांनी असा ठराव मांडला की, माजीमंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रयत्नामुळेच लातूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व पूरामुळे शेती पीकाचे मोठे नुकसान झाले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना औराद येथे पाहणी दौऱ्याला आणून त्याची तिव्रता लक्षात आणून दिली त्यामुळेच जिल्यातील शेतकऱ्यांना भरीव मदत मंजूर झाली. शिवाय औराद येथे शेतकरी भवन मंजूर करून निधीचीही तरतूद केल्याबद्दल संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला यास संचालक रामभाऊ काळगे यानी अनुमोदन दिले. हा ठराव टाळ्या वाजवून सर्व संचालकांनी एकमताने मंजूर केला.

यावेळी सभापती नरसिंग बिरादार,

उपसभापती शाहूराज थेटे, वाघजी पाटील, शाहूराज पाटिल, बंकट बिरादार, नागनाथ स्वामी, कालिदास रेड्डी, सचिव सतिश मरगने यासह सर्व संचालक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *