सुप्रीम कोर्टातील दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला असून या प्रकरणातील निकाल सर्वोच्च न्यायालयानं राखून ठेवला आहे. या प्रकरणाची सुनावणी नबाम रेबिया प्रकरणानुसार होणार का? हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे जाणार का? याबाबतचा निकाल सुप्रीम कोर्टानं राखून ठेवला आहे.
सत्तासंघर्षाबाबत सुप्रीम कोर्टात तीन दिवस चाललेला दोन्ही बाजूचा युक्तिवाद संपला आहे. आज सकाळी सुनावणी सुरू झाल्यानंतर कोर्टात शिंदे गटाकडून जोरदार युक्तीवाद झाला त्यानंतर ठाकरे गटाकडूनही प्रतिवाद झाला. दुपारी लंच ब्रेकची वेळ झाली असतानाही कोर्टानं जेवणाची वेळ पुढे ढकलून सुनावणी सुरू ठेवली अखेरीस जोरदार घमासान आणि दावे प्रतिदावे ऐकत अखेरीस सुप्रीम कोर्टानं हा निकाल राखून ठेवला आहे. पुढील तारीख मात्र कोर्टानं राखून ठेवली आहे.
या संदर्भात अधिक माहिती साठी खालील बातमी लिंक पाहा
लोकांना विकत घेऊन महाराष्ट्रातले ‘मविआ’ सरकार पाडले; कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद
लोकांना विकत घेऊन महाराष्ट्रातले ‘मविआ’ सरकार पाडले; कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद