सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठीच शिवसेना शाखेची स्थापना-डॉ शोभाताई बेंजर्गे
निलंगा /प्रतिनिधी;-संपूर्ण देशामध्ये 80 टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारणासाठी प्राधान्य देणारी संघटना म्हणजे शिवसेना म्हणूनच सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठीच शिवसेना शाखेची स्थापना करण्यात आल्याचे लातूर जिल्ह्याच्या महिला संघटिका डॉक्टर शोभाताई बेंजर्गे यांनी मौजे बोटकुळ येथील शिवसेना शाखा उद्घाटन प्रसंगी बोलताना मत व्यक्त केले.
आज निलंगा तालुक्यातील मौजे बोटकुळ येथे शिवसेना शाखेच्या अनावराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी शिवसेनेच्या रणरागिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला आघाडीच्या लातूर जिल्हा संघटिका डॉक्टर शोभाताई बेंजर्गे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ सगरे तालुकाप्रमुख अविनाश दादा रेशमे विधानसभा प्रमुख शिवाजीराव पांढरे युवा सेनेचे उपजिल्हा युवाधिकारी अण्णासाहेब मिरगाळे लातूर शिवसेनेचे विधानसभा समन्वयक युवराज वंजारे कामगार आघाडीच्या महिला जिल्हा संघटिका प्रीती ताई कोळी युवा सेनेचे तालुका युवा अधिकारी प्रशांत वांजरवाडे व्यापारी आघाडीचे तालुका संघटक प्रसाद मठपती अडत व्यापारी आघाडीचे किशनराव मोरे लातूरवरून आलेल्या टीनाताई अलकाताई आदी प्रमुख व्यासपीठावर उपस्थित होते