महाराष्ट्र महाविद्यालयात २२ रक्तदात्यांनी केले रक्तदान
निलंगा: येथील महाराष्ट्र महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने कर्मयोगी डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष मा. विजय पाटील निलंगेकर हे उपस्थित होते. त्यांनी याप्रसंगी लातूर येथील शासकीय रक्तपेढीच्या टीमचे स्वागत करून या शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या. या शिबिरात राष्ट्रीय सेवा योजनेच्या एकुण २२ स्वयंसेवकांनी रक्तदान करून या राष्ट्रीय कार्यात मोलाचे योगदान दिले.
या रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपूके, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. प्रशांत गायकवाड, डॉ. भास्कर गायकवाड, डॉ. गोविंद शिवशेट्टे, डॉ. हंसराज भोसले, प्रा. विश्वनाथ जाधव महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उद्घाटन सत्राचे संचलन रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. सुभाष बेंजलवार यांनी केले तर आभार डॉ. विठ्ठल सांडूर यांनी मानले.
रक्तदान शिबिरासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय लातूर येथील रक्तपेढीचे रक्तसंक्रमन अधिकारी डॉ. शरयू सुर्यवंशी, डॉ. आर. एस. माने, समाजसेवा अधीक्षक चौधरी एस.आय., अधीपरीचारक बी. डी. सुर्यवंशी, टिपरसे पी. के., शाकिर शेख, स्नेहा मस्के, सविता श्रीमंगले, ऋतूजा गायके यांची उपस्थिती होती. रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. सुभाष बेंजलवार, डॉ. विठ्ठल सांडूर, श्री मनोहर एखंडे, श्री गणेश वाकळे, श्री शिवाजी पाटील, स्वयंसेवक विद्यार्थी स्वराज देशमुख, शकिल शेख, आदिनाथ जाधव, अजय आनंदवाडे, दिपाली सोळूंखे, वसुंधरा अपसिंगेकर, प्रथमेश गायकवाड, गिरी परमेश्वर यांनी विशेष परीश्रम घेतले.