• Mon. Aug 18th, 2025

स्वतः च्या आयुष्याचा अर्थ शोधता आला पाहिजे – डॉ मिलिंद पोदार

Byjantaadmin

Feb 16, 2023

स्वतः च्या आयुष्याचा अर्थ शोधता आला पाहिजे – डॉ मिलिंद पोदार

निलंगा: कार्य करीत असताना स्वतः च्या आयुष्याचा अर्थ शोधता आला पाहिजे असे मत महाराष्ट्र महाविद्यालय,निलंगा येथील विद्यार्थ्यांना तणा-तणाव मुक्त जीवन जगण्याचा मार्ग या विषयावर मार्गदर्शन करताना प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ सावली हॉस्पिटलचे डॉ. मिलिंद पोदार यांनी व्यक्त केले.
पुढे बोलत असताना म्हणाले की,जीवन जगत असताना अनंत अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते.अनेक ताण तणावाला सामोरे जावे लागत. तणाव सुद्धा जीवनासाठी आवश्यक असतो कारण तणाव हेच कार्य करण्यामागची प्रेरणा असते.तणाव संपला की कार्याची प्रेरणा संपली समजा. तणावाला सकारात्मक दृष्टिने सामोरे जाने आवश्यक आहे. ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात आहेत ते करत जावे विशेषतः विद्यार्थी दशेत परिणामांची तमा न बाळगता सतत परिश्रम घ्यावे यश हमखास प्राप्त होईल.जीवनात जो काही आपण निर्णय घेतला आहे त्याचे यश-अपयश याची सर्वस्व जबाबदारी ही स्वतः ची आहे हे ओळखले पाहिजे.परीक्षेतील यश अपयश हा जगण्या-मरण्याचा प्रश्न नाही पण तो आपण बनवतो यातुन बाहेर पडणे गरजेचे आहे.सगळेच डॉक्टर, इंजिनिअर च होतील असे नाही चांगले माणुस,चांगली गृहिणी सुद्धा होता येत हे आपण विसरता कामा नये.शिक्षणातुन तणावाचे व्यवस्थापन करता आले पाहिजे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ माधव कोलपुके मंचावर उपस्थित होते . अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व बेस्ट प्राक्टीस समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ ज्ञानेश्वर चौधरी यांनी केले.सुत्रसंचलन कु.सपना पांचाळ,कु.सुषमा बालकुंदे यांनी केले आभार प्रा.शिवरुद्र बदनाळे यांनी मानले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.चौधरी ज्ञानेश्वर , डॉ गोविंद शिवशेट्टे, प्रा.किवडे धनराज , श्री सिद्धेश्वर कुंभार,श्री दिलीप सोनकांबळे व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *