जाकीर सामाजिक विकास संस्थेमुळे मनोरुग्ण सय्यद नुसरत याचं जगणं बदलूनच टाकलं..
अंघोळ घालवून स्वच्छता करत नवीन कपडे घालताच मला अजून जगायचंय अशी मनोरुग्ण सय्यद ची भावुक प्रतिक्रिया
निलंगा (प्रतिनिधी) :-गेल्या सहा वर्षांपासून सामाजिक कार्याच्या माध्यमातून अनेक मनोरुग्ण व्यक्तींना जगण्याची उमेद देणारी एकमेव जाकेर सामाजिक संस्थेचा पुन्हा एकदा जिल्ह्याभरात त्यांच्या सामाजिक कार्यामुळे नांव चर्चेला जात आहे…
तब्ब्ल तीस वर्षांपासून मनोरुग्ण असल्या वेशभूषा परिधान करून निलंगा शहरांत भिक्षा मागून मंदिर, मस्जिद च्या दानपेटीतील भिक्षा मागितलेले पैसे दान करणारा व्यक्ती म्हणजे नुसरत सय्यद या व्यक्तीला शहरांत निन्नू या नावाने ओळखतात.अनेक वर्षांपासून तो नेहमी प्रमाणे हजरत पिरपाशा दर्गा येथून छत्रपती शिवाजी महाराज चौका पर्यंत चालत निघायचं रस्त्यावर भेटेल त्यास भिक्षा मागायचं.जेवढं दिवसभरात पोटाला लागेल तितकाच खायचं आणि उर्वरित रक्कमेतून तो मस्जिदेला चटाई, नमाज पठण करण्यासाठी जा-नमाज हे कुणालाही न कळता थेट मस्जिद मध्ये ठेवून निघून जायचं. तर पुन्हा दररोज सकाळी उठून भिक्षा मागायचं आणि जमलेल्या पैशे कुठे दर्गा,मंदिर,मस्जिदेच्या दान पेटीत टाकून निघून जायचं.
अश्या मनाने स्वच्छ असलेल्या नुसरत सय्यद चा जीवन बदलण्याची कोणालाही बुद्धी सुचली नाही. त्यास नवीन कपडे द्यावा असं ही कोणाला वाटलं नाही मात्र हे दृश्य आपल्या उभ्या डोळ्याने जाकेर शेख यांनी नुसरत सय्यद उर्फ निन्नू याचा दोन दिवस पाठलाग केला तो दिवसभरात काय करतो-?सकाळी उठून चालत चालत कुठपर्यंत येतो–?भिक्षा मागून तो स्वतःच्या पोटाला काय खातो–?आणि दिवस मावळ्ल्या नंतर तो विश्रांती कुठं घेतो–?याची संपूर्ण प्रत्यक्षात स्वतःच्या डोळ्याने संकलन केल्यानंतर सामाजिक कार्याचा वसा उचलेली जाकीर सामाजिक विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जाकेर शेख यांनी आज सकाळी आपल्या सर्व सहकार्याना एकत्र बोलवून नुसरत सय्यद उर्फ निन्नू यास जवळ घेतले त्या मनोरुग्णास आदरपूर्वक खुर्चीवर बसून त्याची कटिंग दाळी करत आंघोळ घातले संपूर्ण स्वच्छता केल्यानंतर जाकेर शेख यांनी स्वतःच्या कापड दुकानाकडे निन्नू यास सोबत घेऊन त्याच्या पसंतीचे कपडे त्यास परिधान केले.
अक्षरशः तो मनोरुग्ण हे सगळं केल्यानंतर ढसा ढसा रड्याला लागला. तो म्हणाला या जगातही भाऊ भावाचा नाही. लेकरू बापाचा नाही आणि तुम्ही माझ्या अंगात घाण वास येत असताना सुद्धा माझी कटिंग दाळी करून मला आंघोळ घातली आणि नाविन कपडे मला अंगावर घालायला दिले. खऱ्या अर्थाने आज माझा सण आहे आणि तो मी साजरा करणार आहे.तो मनोरुगणांचा शेवटचा वाक्य मनाला शांती लावणारा होता तो म्हणाला की मला भाऊ आहेत ते पण रस्त्यावर झोपत होते त्यांची कोणीही दखल घेतली आणि मात्र माझ्या पोटाच्या लेकरं सारखं तुम्ही सगळेजण तरुण मंडळी मला आज जगण्याची नवीन उमेद ची किरण दाखवली. आज मी धन्य झालो.मला अजून जग बघायचं आहे.लेकरनो तुम्हाला मनातुन आशिर्वाद देतो तुम्हाला उदंड लाभावे आणि आयुष्य निरोगी जावं माझ्या घरातील लोकांनी आम्हा तिन्ही भाऊंना रस्त्यावर टाकून दिले मात्र शेवटच्या क्षणात तुम्ही मला आंघोळ घालवून स्वच्छ करून नवीन कपडे घातले.आज माझं खरं तर सण आहे अशी भावनिक प्रतिक्रिया मनोरुग्ण सय्यद नुसरत यांनी दिली.अनेकांना नवीन संजीवनी व पूर्णजन्म देणारे डॉक्टर्स असतात याच सामाजिक कार्याची आवड डॉ लालासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करतोय तर आज असं वाटतंय की आम्ही जगण्याची उमेद लोकांना देतो आणि आपल्या निलंग्याच्या भूमीपुत्राना सामाजिक कार्यातून मानवतेचा धर्म यावर आम्ही चालण्याचा प्रयत्न करतोय. माणूस म्हणून माणुसकी जपण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय अशे कार्य आमच्या हातून घडत आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो अशी प्रतिक्रिया सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जाकीर शेख यांनी व्यक्त केली.या बद्दल निलंगा तालुक्यातील विविध क्षेत्रातून जाकीर यांच्या सामाजिक कार्याबद्दल कौतुक होत आहे.. यावेळी नगरसेवक हसन चाऊस अबू सय्यद ऋषिकेश पोद्दार जीवन कांबळे शिवाजी जाकीर शेख उपस्थित होते