• Sun. May 4th, 2025

शिवसेनेच्या वतीने फत्तेपुर येथे नेत्रचिकित्सा व सर्व रोग निदान शिबिराचे उद्घाटन

Byjantaadmin

Jun 26, 2023
शिवसेनेच्या वतीने फत्तेपुर तालुका औसा येथे नेत्रचिकित्सा व सर्व रोग निदान शिबिराचे उद्घाटन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने  यांच्या हस्ते करण्यात आले.
 शिवसेना प्रमुख  बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव ठाकरे  यांच्या प्रेरणेतून शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे शिवसेनेचे उपनेते मराठवाडा समन्वयक विश्वनाथ नेरुरकर  व शिवसेना लातूर जिल्हा संपर्कप्रमुख आमदार रोहिदास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या नेतृत्वात औसा तालुक्यामध्ये 110 गावचे नेत्रचिकित्सा व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे आज दिनांक 26 जून 2023 रोजी फत्तेपुर या गावी सदरील शिबिराचे उद्घाटन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या हस्ते करण्यात आले  याप्रसंगी जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने म्हणाले की शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिदोरी पाठीशी घेऊन 80 टक्के समाजसेवा 20 टक्क्याच राजकारण हा कानमंत्र घेऊन शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे  यांच्या नेतृत्वाखाली संबंध महाराष्ट्रामध्ये शिवसेना समाज उपयोगी धोरण घेऊन वेगवेगळ्या घटकाला न्याय देण्यासाठी झगडत असते अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात लढा देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे  यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातला तमाम शिवसैनिक सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून समाजाचे देणं लागतो या भावनेतून समाजसेवेचे व्रत स्वीकारलेला शिवसैनिक खंबीरपणे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीमागे उभा असल्यामुळे आज या महाराष्ट्र मध्ये फक्त आणि फक्त उद्धवजी ठाकरे नावाची चर्चा चालू आहे याचउद्धवजी ठाकरेच्या पाठीमागे आपण खंबीरपणाने उभा टाकावं आपले आशीर्वाद द्यावेत आम्ही प्रसंगी रक्त देऊ समाजासाठी रक्त सांडू अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढा उभा करून हे सगळं आणि सगळं फक्त तुमच्यासाठी आम्ही करत असताना इतर काही लोक शिवसेना संपवण्यासाठी षडयंत्र आखत आहेत
परंतु शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे यांच्या नेतत्वाखालील जोमाने उभी टाकत आहे शिवसेना नेहमीच संकट समय सर्वसामान्यांच्या हितासाठी धावून जाणारी संघटना आहे शिवसेनेच्या वतीने समाज उपयोगी उपक्रम राबवून शिवसेना तळागाळात रुजलेली आहे औसा तालुक्यातील शिवसैनिक शिवसेना पक्षप्रमुख  उद्धवजी ठाकरे  यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभा असून सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून त्यांचे प्रश्न त्यांच्या व्यथा प्रसंगी प्रशासनासोबत शासनासोबत झगडून न्याय मिळवून देणारा शिवसैनिक निश्चितच औसा तालुक्याला गत वैभव प्राप्त करून देईल असा विश्वास मला आहे तरी या शिबिराचा लाभ गावातील गोरगरीब सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचला पाहिजे अशा पद्धतीचे नियोजन या गावचे शाखाप्रमुख गोविंद साळुंखे यांचे सर्व सहकारी या गावचे सरपंच बलभीम माळी या सर्वांनी केल्याबद्दल त्यांचे खूप खूप कौतुक मी करतो आणि या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा असे आव्हान जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने साहेब यांनी केले याप्रसंगी सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपतालुकाप्रमुख निलेश आजणे यांनी केलं तर प्रास्ताविक तालुक्याचे तालुकाप्रमुख तानाजी सुरवसे यांनी केलं या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन माजी तालुकाप्रमुख संजय उजळंबे यांनी केलं याप्रसंगी उपास्थित लातूर जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख  शिवाजीराव माने औसा तालुका प्रमुख तानाजी सुरवसे माजी. तालुका  संजय भाऊ उजळबे ,उपतालुकाप्रमुख निलेश आजणे फत्तेपुर गावचे सरपंच बलभीम माळी, तंटामुक्ती अध्यक्ष ज्योतीराम साळुंखे शाखाप्रमुख गोविंद साळुंखे ,करजगाव शाखाप्रमुख अनिकेत वाकसे राजेश मुगळे ,श्याम जाधव ,नागेश पाटील ,जावळीचे सलीम पटेल, सुधाकर मुगळे ,ज्येष्ठ शिवसैनिक भागवत भाऊ लांडगे ,रावसाहेब पाटील ,तानाजी मुगळे ,शालेय समिती चे अध्यक्ष साळूंके ,फत्तेपुर गावातील शिवसैनिक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *