निलंगा येथे राजर्षी शाहु महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
निलंगा(प्रतिनिधी):-निलंगा शहरामध्ये सर्व धर्मीय राजर्षी शाहु महाराज जयंती उत्सव समिती व महाविकास आघाडी शाहु फुले चारीटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमान छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून व फुले वाहुन विनम्र अभिवादन करण्यात आले तर जयंतीनिमित्त दापका वेस येथील श्री शिवाजी प्राथमिक विद्यालया मध्ये साई क्रिटीकेअर हास्पिटल व शाहु फुले चारीटेबल ट्रस्टच्या वतीने सर्व रोग निदान शिबीर संपन्न झाले या वेळी महाविकास आघाडी च्या अनेक मान्यवर नेत्यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या सामाजिक बहुजनासाठी केलेल्या कार्यवर प्रकाश टाकला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पंडीतराव धुमाळ सर्व धर्मीय जयंती उत्सव समितीचे समन्वय प्रा दयानंद चोपणे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख विनोद जी आर्य माजी नगराध्यक्ष हमीद शेख काँग्रेस डॉक्टर सेल जिल्हाध्यक्ष अरविंद भातंब्रे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख हारी भाऊ सगरे शाहु फुले चारीटेबल ट्रस्ट चे देवदत्त सुर्यवंशी साहेबराव कांबळे लक्ष्मण सुर्यवंशी आलत्फ शेख माजी जि प सदस्य ऐस के चेले राष्ट्रवादी चे शहर अध्यक्ष इस्माईल लदाफ धम्मानंद काळे निलंगा तालुका अल्पसंख्याक काँग्रेस चे अध्यक्ष लाला पटेल संभाजी ब्रिगेड चे प्रमोद कदम ओबीसी सेवासंघाचे मोहन क्षीरसागर सुनिल नायकवाडे प्रशांत वांजरवाडे क्रां लहुजी सेनेचे गोविंद सुर्यवंशी अजय कांबळे भिम शक्ती चे दिगंबर सुर्यवंशी गण राज्य चे रामलिंग पटसाळगे रोहन सुरवसे राष्ट्रवादीच्या महिला सदस्या सै संगिता कदम सै महादेवी पाटील सै फुलसुरे ताई तुराब बागवान सलीम शेख बाळासाहेब देशमुख ईत्यादी उपस्थित होते
तर आरोग्य शिबीरासाठी साई क्रिटीकेअर हास्पिटल चे डॉ राजशेखर मेनगुले डॉ शिवकन्या यादव राहुल गावकरे शिवकन्या काबंळे संतोष सातपुते प्रकाश खंडापुरे यांनी गांधी नगर अशोक नगर मिलींद नगर दापका वेस साळवे नगर माळी गल्ली येथील पुरुष महिला रुग्णाची राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त मोफत तपासणी करुन औषध देण्यात आले या वेळी डॉ अरविंद भातंब्रे यांनी शिबीरा विषयी सविस्तर माहिती दिली व मुख्याध्यापक लामतुरे सर यांनी शिबीरासाठी शाळा उपलब्ध करुन दिल्याबद्दल आभार मानले.