मारिया पोदार लर्न स्कूल निलंगा येथे योग सप्ताहा संपन्न
निलंगा दिनांक १९ जून २०२३ मारिया पोदार लर्न स्कूल येथे आंतराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून वसुधैव कुटूंबक्कम या संकलपनेने प्रेरीत योग सप्ताहाचे दिनांक १९ जून ते २४ जून पर्यंत आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शाळेती लइ.१ली ते १० वि वर्गांतील विद्यार्थी व पालकांचा उस्फुर्त व सक्रिय सहभाग होता. या योग सप्ताहा मध्ये विद्यार्थ्यांना व पालकांना आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान धारणा आणि समाधी याबद्दल विशेष मार्गदर्शन करण्यात आले. या सप्ताह निमित्ताने निलंगा परिसरातील विद्यार्थी व पालकांनी लाभ घेतला. शालेय प्रशासनाच्या वतीने सहभागी पालकांचे आभार व्यक्त केले आहेत.