माजी पालकमंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त किल्ले रायगड दर्शन मोहिम संपन्न
अजित पाटील कव्हेकरांचा अभिनव उपक्रम
लातूर :-लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लातूरातील शिवप्रेमी युवकांसाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या संकल्पनेतून किल्ले रायगड दर्शन मोहिम नुकतीच संपन्न झाली. महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची प्रेरणा युवाशक्तीला मिळावी या उदात्त हेतूने अजित पाटील कव्हेकर यांनी लातूर शहर परिसरातील युवकांसाठी हा उपक्रम स्वखर्चातून राबवत नवा आदर्शही तरुणाईसमोर ठेवला.
या उपक्रमादरम्यान आयोजीलेल्या कार्यक्रमात माजी पालकमंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकरांचा क्रेनद्वारे पुष्पहार घालून नागरी सत्कारही करण्यात आला. या प्रसंगी माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर, सांस्कृतिक प्रकोष्ठचे राज्य अध्यक्ष शैलेश गोजमगुंडे, भाजयुमो चे लातूर शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक अजितसिंह पाटील कव्हेकर, माजी स्थायी समिती सभापती दिपक मठपती, मा.नगरसेविका शोभाताई पाटील, भाग्यश्री शेळके, वर्षाताई कुलकर्णी, मा.परिवहन सभापती मंगेश बिरादार, भाजपा लातूर शहर जिल्हा सरचिटणीस शिरीष कुलकर्णी, सुरेश राठोड, श्रीराम कुलकर्णी, प्रदिप मोरे, संजय गीर, जाफर पटेल, बालाजी शेळके, धनंजय हाके, बालाजी गाडेकर, शिवसिंह सिसोदिया, देवा गडदे, सिद्धेश्वर उकरडे, पुनम पांचाळ, आफ्रीन खान, भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चा लातूर शहर जिल्हा पदाधिकारी व सदस्य यांच्यासह परिसरातील नागरिक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी लातूर शहरातील विविध विकास कामांसाठी एक कोटी (1 कोटी) रुपयांचा निधी मिळवण्यासाठी अजितभैय्यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला असल्याचा उल्लेख करत या कामांचे उद्घाटन करण्याचा योग हा सुवर्ण योग असल्याचे सांगितले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना संभाजीभैय्या निलंगेकर म्हणाले की रायगड किल्ले दर्शनाची मोहिम राबवून राष्ट्रभक्ती व राष्ट्रचेतनेचा नवा आयाम अजितसिंह पाटील यांना निर्माण केला असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनीही वाढदिवसानिमित्त संभाजीराव पाटील निलंगेकर यांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी प्रास्ताविक मांडताना भाजयुमोचे शहर जिल्हाध्यक्ष कार्यक्रमाचे संयोजक अजितसिंह पाटील कव्हेकर म्हणाले की, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार व आदर्श राज्यकारभाराची प्रेरणा ऐतिहासिक गड-किल्ल्यांमधून मिळावी व तेजस्वी युवक निर्माण व्हावेत यासाठी किल्ले रायगड दर्शन मोहीम आखल्याचे सांगितले व अशा उपक्रमातून नवी चेतना निर्माण होईल असा विश्वास व्यक्त केला. या प्रसंगी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते व रायगड मोहिमेत सहभागी युवकांसह नागरिक, बंधू-भगिणी मोठ्या संख्येने सहभागी होते.