पाझर तलावात दुसऱ्या गावास विहिरीस परवानगी दिल्यास नणंद ग्रामस्थांचा आत्मदहनाचा इशारा
निलंगा -नणंद पाझर तलावातून शिंगनाळ गावास जलजीवन योजनेतून विहिरीस परवानगी दिली तर नणंद ग्रामस्थ आत्मदहन करतील असा इशारा नणंद ग्रामस्थांच्या वतीने निवेदनाद्वारे पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता शेलार यांना दिला आहे.
निलंगा तालुक्यातील नणंद या गावची लोकसंख्या पंधरा हजार असून गावात चार दिवसांनी पाणीपुरवठा होत असून ननंदच्या पाझर तलावात गावास पाणीपुरवठा करण्यास एकच वीहीर असून त्याच विहिरीच्या माध्यमातून गावात पाणीपुरवठा होतो. त्या विहिरीच्या पाचशे मीटरच्या आतच जलजीवन योजनेच्या विहिरीला परवानगी देण्यात आलेली आहे. जर ती विहीर पाडली तर नणंद या गावच्या शासकीय विहिरीचे पाणी आपोआपच कमी होईल व ननंद गावास पाणीटंचाईला, दुष्काळाला भविष्यात सामना करावा लागेल. मागील चार वर्षांपूर्वी पाणीटंचाईमुळे दोन विहिरी व चार इंधन विहीरीचे ग्रामपंचायतीस अधिग्रहण करावे लागले. शिंगनाळ् या गावाला स्वतःचे दोन पाझर तलाव असून शिंगनाळ गावाला लागूनच माळेगाव हे गाव आहे. शिंगनाळ, माळेगाव या गावातूनच जलजीवन योजनेची विहीर घेण्यात यावी. ननंद येथील पाझर तलावात विहीर घेण्यास समस्त नणंद गावकऱ्यांचा विरोध आहे. आपल्या माध्यमातून विहिरीस परवानगी दिल्यास ननंद गावास भविष्यात पाणी पुरवठा, दुष्काळाला समस्त ग्रामस्थांना तोंड द्यावे लागेल, याचा विचार करून शिंगनाळ गावातच त्यांना विहिरीचे परवानगी द्यावी. नणंद गावात विहिरीस परवानगी दिल्यास समस्त गावकरी आपल्या कार्यालयासमोर आत्मदहन करतील असा इशारा युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. आण्णासाहेब मिरगाळे यांनी निवेदनाद्वारे समस्त ग्रामस्थांच्या वतीने पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता शेलार यांना दिला आहे. निवेदन देताना सोबत बालाजी नारायण पुरे, राजेंद्र तांबाळे, कुमार लादे, बालाजी गिरी, उद्धव जाधव, सागर कोरके,अभय मिरगाळे इत्यादी उपस्थित होते. निवेदनावर अनेक ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.