शिवणी खुर्द येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न
लातुर:-.ग्रामपंचायत कार्यालय द्वारा गावातील दहावी ,बारावी, सीईटी व नीट परीक्षेमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायतचे सरपंच श्री बाळू गायकवाड तर प्रमुख पाहुणे म्हणून संत गाडगेबाबा प्रबोधन कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संभाजी नवघरे सर ,शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव सर ,सरस्वती विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक तथा रयत प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे मार्गदर्शक श्री शिवाजी पाटील सर ,संभाजी ब्रिगेड महानगर अध्यक्ष श्री मिथुन दिवे ,शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री जनक पवार सर ,शिक्षण महर्षी पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे तालुकाध्यक्ष कमलाकर सूर्यवंशी सर, उपसरपंच हरीपाल मोरे ,ज्येष्ठ नागरिक डॉक्टर यशवंतराव तत्तापुरे ,ग्रामपंचायत सदस्य राहुल आवटे, बाळू बरुरे ,इस्माईल बेग, हंसराज बिरादार सर केशरबाई,शिरसाट काशीबाई शिंदे, पोलीस पाटील निवृत्ती गुनाले व गावातील इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रभाकर जाधव यांनी केले यावेळी धर्मराज सुधाकर माने ,अस्मिता औदुंबर जाधव ,अथर्व पांडुरंग जाधव ,गणेश बालासाहेब देशपांडे ,भक्ती रंगनाथ जाधव ,सुजाता परमेश्वर जाधव ,धरती महावीर जाधव ,तन्मय लक्ष्मण मोरे ,कार्तिक काशिनाथ आवटे ,शंभवी दिनकर सुडे, श्रुती बालाजी चामे ,प्रणव बालाजी चामे या गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायतीतर्फे शाल ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी शिवाजी पाटील सरांनी विद्यार्थ्यासमोरील आव्हाने काय आहेत व त्या आव्हानावर मात करून अभ्यास कसा करावा आई-वडिलांचे कर्तव्य काय आहे यावर मार्गदर्शन केले. प्रमुख व्याख्याते म्हणून प्राध्यापक संभाजी नवघरे सरांनी समाजातील अंधश्रद्धा रूढी परंपरा यावर मात करून विद्यार्थी कसा घडवावा, विद्यार्थ्यांमध्ये सुप्त गुणांना कसं वाव द्यावा हे सांगून गावातील लोकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. शिक्षणाशिवाय या स्पर्धेच्या युगात पर्याय नाही म्हणून सर्वांनी शिक्षणाला महत्त्व देण्याचे आवाहन केले शेवटी आभार गावचे माजी सरपंच श्री मुकेश जाधव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी या सर्वांनी सहकार्य केले यावेळी गावातील नागरिक महिला, विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी उपस्थित होते.