गुणवंत विद्यार्थी सत्कार व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न
डॉ अरविंद भातांब्रे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम
शिरूर अनंतपाळ(प्रतिनिधी):-शहरातील सामाजिक कार्यकर्ते व शिरूर अनंतपाळ नगरीचे भुमिपुत्र डॉ अरविंद भातांब्रे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील व परिसरातील दहावी व बारावीच्या तसेच नीट परिक्षेतीलगुणवंत विद्यार्थी आशुतोष कोरे यांनी 675 गुण व मंथन हासबे यांनी नीट परिक्षेत नेत्रदीपक यश संपादन केल्यामुळे त्याचा सत्कार करण्यात आला तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर व मोफत चष्मे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात 108 रुग्णांची तपासणी करण्यात आली यामधील 82 रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले तसेच या शिबिरात स्त्रिरोग तज्ञ डॅा बरूरे सर व डॅा अरविंद भातांब्रे याच्या मार्गदर्शनात 15 स्त्रियांच्या दुर्गम आजाराच्या तपासण्या करून पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले या वेळी या कार्यक्रमाच्या अध्दकस्थानी संजय उडदे गुरूजी तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ पिरमहमद तांबोळी, सेवानिवृत आदर्श शिक्षक विरभद्र भातांब्रे गुरूजी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष आबासाहेब पाटील, शिरूर अनंतपाळ नगरपंचायतचे गटनेते संतोष शेटे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख भागवत वंगे, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अशोक कोरे, सभापती संतोष शिवणे, बालाजी येरोळे,अनिल देवंगरे, सुचित लासुणे आदि मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमासाठी जनता विकास मंचचे सचिव आसिफ उजेडे, मुसा मुजेवार,प्रतीक पारशट्टे, शैलेश वलांडे,आसिफ मुजेवार,राष्ट्रवादी कॅाग्रसचे शुभम आयतनबोणे,ओम मुर्गे आदिने परिश्रम घेतले तर सुत्रसंचलन राजकुमार अचवले यांनी केले तर आभार आसिफ उजेडे यांनी केले.