• Sat. Aug 16th, 2025

लातूर जिल्हा बँक पगारदार कर्मचाऱ्यांना ६० लाख रुपयांपर्यंत गृहकर्ज देणार-बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख यांची माहिती

Byjantaadmin

Jun 24, 2023

लातूर जिल्हा बँक पगारदार कर्मचाऱ्यांना ६० लाख रुपयांपर्यंत गृहकर्ज देणार-बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख यांची माहिती

बँकेच्या संचालक मंडळाने घेतला निर्णय

 

लातूर (प्रतिनिधी):-राज्यातील जिल्हा बँकात नावलौकिक असलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून पगारदार कर्मचाऱ्यांना ६० लाख रुपयांपर्यंत गृहकर्ज देण्याचा महत्वपूर्ण निर्णय बँकेच्या संचालक मंडळाने घेतला असून यामुळे जिल्ह्यांतील पगारदार कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे याबाबत लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालयात शुक्रवारी २३ जून रोजी जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या सन्माननीय संचालक मंडळाने हा निर्णय घेतला आहे

लातुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करत पाठीशी खंबीरपणे उभी राहिली असुन आता पगारदार कर्मचाऱ्यांना ६० लाख रुपयांपर्यंत गृहकर्ज देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून सध्याच्या परिस्थितीत बांधकाम क्षेत्रांत होत असलेली महागाई लक्षात घेऊन निर्णय घेतला आहे यापूर्वी बँकेकडून ३० लाख रुपयांपर्यंत गृह कर्ज मर्यादा अपुरे पडत असल्याने जिल्ह्यांतील पगारदार कर्मचाऱ्यांची मागणी लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे तसेच यावर कोणतेही प्रोसेसिंग फीस खर्च आकारली जाणार नाही असेही बँकेने स्पष्ट केले आहे

पगारदार कर्मचाऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा

या वाढीव गृहकर्जामुळे जिल्ह्यांतील पगारदार कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून तात्काळ कर्ज मिळण्याची सुविधा बँकेने उपलब्ध करून दिली आहे तसेच या या कर्ज योजनेवर इतर बँका प्रमाणे कुठलीही प्रोसेसिंग फी आकारली जाणार नाही यावर रास्त सरळ व्याज दर आकारले जाणार आहे असे सांगून या वाढीव कर्ज योजनाचा पगारदार कर्मचाऱ्यानी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी केले आहे

शुक्रवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीला माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव, जेष्ठ संचालक तथा आमदार बाबासाहेब पाटील, संचालक पृथ्वीराज शिरसाठ, संचालक एन आर पाटील, व्यंकटराव बिरादार,संचालक अशोक गोविंद पुरकर, अँड राजकुमार पाटील, भगवानराव पाटील तळेगावकर, जयेश माने, दिलीप पाटील नागराळकर, संचालक अनुप शेळके ,संचालिका सौ स्वयंप्रभा पाटील, सौ सपना किसवे, सौ अनिता केंद्रे, कार्यकारी संचालक हणमंतराव जाधव विविध खाते प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *