राज्य परिवहन मंडळाची विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या ठिकाणी ‘बस पासची’ सोय
निलंगा- येथील महाराष्ट्र शिक्षण समिती परिसरात महाराष्ट्र महाविद्यालय, महाराष्ट्र औषधनिर्माणशास्त्र, महाराष्ट्र प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात प्रवेशित शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना निलंगा तालुक्यातून ये – जा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाकडून ‘मंडळ आपल्या दारी’ या योजनेअंतर्गत महाविद्यालय परिसरातच विद्यार्थ्यांना बस पासची सोय करुन देण्यात आली आहे. या योजनेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन बसस्थानकाचे परिवहन महामंडळाचे निलंगा डेपो मॅनेजर बीडवे साहेब, स्थानक प्रमुख पवार साहेब व महाविद्यालयात उपस्थित राहून काम करणारे परिवहन मंडळाचे कर्मचारी वाघमारे साहेब यांनी विद्यार्थ्यांना बस पास काढून देण्यासाठी मोलाचे सहकार्य करीत आहेत. विद्यार्थ्यांना महाविद्यालय व शाळेतच पास परिवहन महामंडळाकडून मिळत असल्यामुळे विद्यार्थी समाधान व्यक्त करत आहेत. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य, शाळांचे मुख्याध्यापक या उपक्रमामुळे परिवहन महामंडळाचे आभार मानले. तसेच बाहेर गावाहून ये – जा करणा-या सर्व विद्यार्थ्यांनी बस पास काढून घ्यावे असे महाविद्यालय व शाळा प्रशासनाने अवाहन केले आहे.