राज्यातील शिंदे सरकारला जवळपास वर्ष पूर्ण होत आले आहे. तरीही राज्य सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार झालेला नाही. मंत्रीमंडळ विस्तारासाठी नवनवीन मुहूर्त सांगितले जात आहेत. मात्र, आता मंत्रीपदासाठी इच्छूक असणाऱ्या नेत्यांचा धीर सूटत चालला आहे. त्यातच आता आमदार बच्चू कडू यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे.बच्चू कडू म्हणाले, सरकारमध्ये ती क्षमता नाही आहे. मंत्रीमंडळ विस्ताराला वर्षभर लागेल, असे आम्हाला वाटले नव्हते. मात्र, ते नाही झाले. त्यांनी मंत्री केले नाही. मात्र, काही चांगली काम झाली आहेत, यामुळे मी नाराज नाही आहे. मंत्रीमंडळ विस्तार आता २०२४ नंतरच होईल, हे मी नेहमी सांगत असतो. ती क्षमता सध्या सरकारमध्ये नाही आहे, असे आमदार बच्चू कडू म्हणाले.
तसेच जे अशा प्रकारे आमच्यावर आरोप करतात, गद्दार म्हणतात त्यांच्याविरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहोत. मानहानीचा दावा दाखल करणार. मीही कोर्टात दाद मागणार. आम्ही विकासासाठी तिकडे गेलो.udhav thakre माणूस म्हणून खूप चांगले आहेत. मात्र, मुख्यमंत्री म्हणून ते कमी पडले म्हणून आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला, असेही बच्चू कडू म्हणाले.५० आमदारांची गळचेपी झाली आहे. विरोधक त्यांच्यावर खोके घेतले म्हणून आरोप करत आहेत. तर मित्रपक्ष BJP त्यांना त्रास पण होत आहे. बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो आहे. मी माझ्याही मतदारसंघात पाहिले, असा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे.