बकरी ईदचा सण काही दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाच आता राज्य सरकारकडून पोलिसांना महत्त्वपूर्ण सूचना जारी करण्यात आल्या आहे. भाजपा नेते आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज्यात गोवंश हत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश जारी केले आहे. पोलीस महासंचालकांना नार्वेकर यांनी पत्र लिहून आदेश दिले आहे. गोवंश हत्या बंदी कायदा उल्लंघनाच्या तक्रारी मिळाल्याचा उल्लेखही राहुल नार्वेकर यांनी पोलिसांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. त्यामुळं आता यावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. याशिवाय बकरी ईदला राज्यातील अनेक शहरांमध्ये पोलिसांना नजर ठेवण्याचेही निर्देश देण्यात आले आहे.
येत्या २९ जून रोजी महाराष्ट्रासह देशभरात बकरी ईद साजरी केली जाणार आहे. त्यापूर्वीच विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहिलं आहे. त्यात त्यांनी गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहे. विशेषत: राज्यातील मालेगाव, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, सातारा, धाराशिव, धुळे आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी, अशी निर्देश विधानसभा अध्यक्षांनी पोलीस महासंचालकांना दिले आहे. काही दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये गोतस्करीच्या संशयावरून एका तरुणाची जमावाकडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आता राज्य सरकारने या कायद्याच्या कठोर अंमलबजावणीचे आदेश दिले आहे.
गेल्या वर्षी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून पोलिसांना सूचना जारी करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता यंदाही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पोलिसांना पत्र लिहून गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या आहे. त्यानंतर आता राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पोलीस अलर्टवर असून गोहत्या करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.