• Wed. Aug 20th, 2025

चारचाकी वाहन चोरी करणारा आरोपी 24 तासाचे आत पोलिसंच्या ताब्यात

Byjantaadmin

Jun 17, 2023
चारचाकी वाहन चोरी करणारा आरोपी 24 तासाचे आत गांधी चौक पोलिसंच्या ताब्यात पहा
LATUR पोलीस ठाणे गांधी चौक लातूर येथे फिर्यादी रघुनाथ आप्पाराव भाग्यवंत रा. मानिकनगर परळी यांचा अशोक लेलँड पिकअप गाडी क्रमांक एम एच 44 यु 0070 किमती 500000/-रू. व त्यामध्ये पेंड खजूर भरलेला किमती 200000/- रू. त्यांचे मालकीचे शिवशक्ती  ट्रान्सपोर्ट सम्राट चौक लातूर येथून दिनांक 13 व 14/6/2023 चे रात्री दरम्यान अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहे अशा फिर्यादीवरून पो स्टे गांधी चौक येथे गुरनं. 263/2023 कलम 379 भांदवि. प्रमाणे दाखल आहे. सदर गुन्ह्याचे तपास करीत असताना गुप्त बातमीदार मार्फत  मिळालेल्या माहितीच्या आधारे  शोध घेतला असता वासनगाव ता. लातुर शिवारात तुलसी हॉटेलच्या बाजूस नमुद गुन्हयातील चोरीस गेलेले वाहन व विधी संघर्ष ग्रस्त बालक वय 17वर्ष यास मुद्देमाला सह ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने पोस्टे शिवाजीनगर लातूर चोरी केलेली बोलेरो जीप व पोस्टे तुळजापूर जि. धाराशिव चोरी केलेली टाटा सुमो असे दोन गुन्हे केल्याचे कबूल केले व त्या गुन्ह्यातील चोरीस केलेले वाहने ठेवलेले ठिकाण दाखविले वरून त्याच्याकडून एकूण तीन फोर व्हीलर वाहने किमती अंदाजे 20,00,000/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
1.पोलीस स्टेशन गांधी चौक
CR NO.263/23
अशोक लेलँड पिकअप नं.-MH-44-U-0070
इंजिन नंबर EHH017139
चेसिस न.MB1AA22E1HRE60129
किंमत 700000/-
2)पांढऱ्या रंगाची महिंद्रा कंपनीची बोलेरो जीप
पो.स्टे.शिवाजीनगर
CR.NO..258/2023 इंजिन.न.-GHA4MB0100
चेसीस न.MA1PS 2GH KA2M91122 किंमत 700000/-
3) टाटा सुमो.KA 32-M-4004
पो स्टे तुळजापूर  गुरन.233/2023 इंजिन न.483DL 47BUZ 703276
चेसिस न.446251BUZ907088
किंमत 600000/-
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक  सोमय मुंडे साहेब,अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर भागवत फुंदे  साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रेम प्रकाश माकोडे  साहेब  यांचे नेतृत्वाखाली पोस्ट गांधी चौक लातूर गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक अक्रम मोमीन पोलीस हेड कॉन्स्टेबल दामोदर मुळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र टेकाळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय शिंदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल रणवीर देशमुख, पोलीस नाईक शिवाजी पाटील यांनी केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *