राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या हस्ते माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांना सहकार नेतृत्व पुरस्कार प्रदान
संगमनेर(हरिराम कुलकर्णी):-अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व हरीतक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त आयोजित प्रेरणादिन व पुरस्कार सोहळा राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या शुभहस्ते व माजी मंत्री छगनराव भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी संगमनेर येथे पार पडला.
याप्रसंगी राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष गोविंदसिंग डोटासारा, राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यावेळी होते. यावेळी सहकार, साहित्य, समाजसेवा, पर्यावरण, माध्यम क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल ‘स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार’ थोर विचारवंत मा. डॉ. आण्णासाहेब साळुंखे यांना प्रदान करण्यात आला.
तर सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सेवाभावी संस्था पुरस्कृत ‘सहकारातील नेतृत्व पुरस्कार’ माजी मंत्री, मांजरा साखर कारखान्याचे चेअरमन मा.श्री. दिलीपराव देशमुख यांना राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
तसेच कृषी, शिक्षण, समाजसेवा, पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल ‘डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार’ पर्यावरण तज्ञ, वनराईचे विश्वस्त मा. डॉ. सुधीर भोंगळे यांना राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार लहु कानडे, आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार मोहन जोशी, कल्याण काळे, नामदेवराव पवार, माजी आमदार उल्हास पवार प्रदेश काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष विलास औताडे, हेमलता पाटील, आदिंसह राज्यभरातील विविध मान्यवर, विविध संस्थाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पुरस्कार सोहळ्यास लातूर येथील राज्य साखर महासंघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील माजी आमदार अँड त्रिंबकजी भिसे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव, रेणा साखर कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव मोरे, मारूती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव बाजुळगे, उपाध्यक्ष शाम भोसले, जिल्हा बँकेचे संचालक पृथ्वीराज शिरसाठ संचालक राजकुमार पाटील, संचालक अनूप शेळके, जिल्हा काँग्रेस मीडिया सेल चे जिल्हाध्यक्ष पत्रकार हरिराम कुलकर्णी, मारुती महाराज साखर कारखान्याचे संचालक सचिन पाटील जिल्हा काँग्रेसचे समन्वयक सचिन दाताळ, वडगाव सोसायटी चे चेअरमन सतीश पाटील, रामदास पवार, विजय कदम, प्रभाकर बंडगर, सगरे गुरुजी उपस्थित होते.