अखेर निलंगा नगर परिषदला…
निलंगा:-निलंगा नगर परिषद ला अखेर कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळाले असून लोहारा नगर पंचायतचे मुख्याधिकारी गजाजन शिंदे यांची आज राज्य सरकारच्या वतीने परिपत्रक काढून आदेश पारित केले आहे.गेल्या अनेक महिन्यापासून निलंगा नगर परिषदला कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने अनेक कामे खोळंबली होती.त्याच बरोबर नागरी समस्याचे अनेक प्रश्न प्रलंबित होते.आता कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळाल्याने नागरिकांत समाधान व्यक्त केला जात आहे .