• Tue. Apr 29th, 2025

लातुर जिल्ह्यात 2.2 रिश्टर स्केलचा भूकंपाचा सौम्य धक्का

Byjantaadmin

Sep 23, 2022

लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील मौजे हासोरी परिसरात पहाटे 3 वाजून 38 मिनिटांनी 2.2 रिश्टर स्केलचा भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला असल्याची माहिती जिल्हाधिकारी बी.पी. पृथ्वीराज यांनी पत्रकार परिषदेत दिली. मागील काही दिवसांपासून निलंगा तालुक्यातील मौजे हासोरी परिसरात जमिनीतून मोठे आवाज येत आहेत. त्यामुळे या भागातील नागरिक भयग्रस्त झाले आहेत. या भागात भुकंपाचे धक्के जाणवत असल्याचे नागरिकांचे म्हणणे होते. प्रशासनाने मात्र भुकंप नाही, केवळ जमिनीतून आवाज येत आहेत असे सांगितले होते. शुक्रवारी पहाटे 3.38 मिनिटांनी 2 रिश्टर स्केलचा भुकंप झाला असून त्याची नोंद भुकंप मापक वेधशाळेने घेतली आहे. लातूर येथील भूकंप वेधशाळेपासून 52 किलोमीटर अंतरावर हासोरी परिसरात यांचा केंद्रबिंदू होता. जमिनीखाली 5 किलोमीटर अंतरावर तो असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी राष्ट्रीय भुकंप केंद्र पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे शास्त्रज्ञ राजीव कुमार, अजयकुमार शर्मा, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथील भुगर्भशास्त्र संकुलाचे प्रमुख प्रा. डॉ. अविनाश कदम, प्रा. डॉ. अर्जन भोसले हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed