• Thu. Aug 21st, 2025

निलंगा तालुक्यातील घटना ट्रॅक्टर – दुचाकीचा अपघात नवरा बायको  जागीच ठार 

Byjantaadmin

Jun 17, 2023
ट्रॅक्टर – दुचाकीचा अपघात नवरा बायको  जागीच ठार
संगारेड्डीवाडी येथील दुर्दैवी घटना
निलंगा/प्रतिनिधी
भरधाव ट्रक्टरची दुचाकीला धडक लागून मोटार सायकलवरून जाणारे पती पत्नी जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना निलंगा तालुक्यातील संगारेड्डीवाडी येथे घटडी आहे.
  याबाबत सविस्तर वृत्त असे की  हलगरा वरून सावरीला भरधाव वेगात कच  (वाळू ) ची वाहतूक करणारे ट्रॅक्टर व संगारेड्डीवाडी येथून निघालेल्या दुचाकीचा जोरदार धडक बसल्याने पती पत्नीचा  जागीच गतप्राण झाल्याची दुर्दैवी घटना  काल दि.१६ जुन रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली या घटनेची औराद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.  याबाबत पोलीस विभागाकडून मिळालेली माहिती अशी की, निलंगा येथून खच (वाळू) ची वाहतूक करणारे ट्रॅक्टर MH24AS-8937 दुपारी बारा साडेबारा वाजता हलगरा ते सावरी या मार्गावरुन जात होते त्याच वेळी संगारेड्डीवाडी येथील तानाजी खामकर वय ५५ व त्यांची पत्नी सुकूमार हे दोघे आपल्या दुचाकीवरून (MH12 HX–8047)औराद शहाजनी ला केवायसी करण्यासाठी निघाले होते या दरम्यान भरधाव वेगाने येणा-या ट्रॅक्टर ची जोडीदार धडक बसल्याने पती व पत्नी दोघेही जागीच गतप्राण झाले असल्याचे दिसून आले तद्वत त्या दोघांना ही दवाखान्यात घेऊन गेले असता मृत घोषित करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र हलगरा येथे उत्तरीय तपासणी करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत पुढील तपास सपोनि पंकज शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली व्ही के गीते, लतीफ सौदागर करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *