दत्ता मोहळकर दोन जिल्ह्यातून हद्दपार ; उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांचा निर्णय
निलंगा(प्रतिनिधी) दत्ता मोहळकर याला उपजिल्हाधिकारी शोभा जाधव जाधव यानी दोन जिल्ह्यातून हद्दपार केले असून या निर्णयामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचे धाबे दणाणले आहे…याबाबत सविस्तर वृत्त असे की निलंगा दत्ता मोहळकर याच्यावर विविध कलमान्वय गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्यामुळे येथील निलंगा उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यानी दत्ता मलिकार्जून मोहळकर यांच्या विरूद्ध पोलिस निरीक्षक पोलिस ठाणे निलंगा यानी दाखल केलेला हद्दपारीचा प्रस्ताव मंजूर केला असून प्रतिवादी दत्ता मोहळकर राहणार निलंगा जिल्हा लातूर याना लातूर व उस्मानाबाद या जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले असून असा आदेश दिनांक १२ रोजी उपविभागीय दंडाधिकारी शोभा जाधव यांच्या आदेशाने हा आदेश पारीत करण्यात आला आहे. दत्ता मोहळकर व इतरजन अनेक प्रकरणात मागील भांडणाची कुरापत काढून भांडणे करत असुन काही गुन्हे कॉलेज मधील तरूणाच्या भांडणातील आहेत. सदर इसम हा लोकांसबोत किरकोळ करणावरून हाणामारी करून दहशत निर्माण करतो त्याची ही सवय आहे. गावात सतत उनाडक्या करत फिरतो त्यामुळे लोक त्याच्या विरूध्द तक्रार देण्यास घाबरतात. शहरात जयंती उत्सव, सण, निवडणुका असताना दता मल्लीकार्जुन मोहळकर यांना लातूर, उस्मानाबाद, नांदेड या तीन जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हृददपार करण्यासाठी प्रस्ताव नमुद केलेला आहे. व पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी प्रस्ताव सादर करून सदर इसम हा सतत गैरकृत्य करीत राहतो, अत्यंत आडदांड, गुंड प्रवृतीचा असुन त्यास कायदयाची जराही भिती नाही भविष्यात त्याच्या वर्तणुकीत सुधारणा होईल याची हमी घेणारा पण कोणी आमच्या समोर हजर राहून त्याच्या विरोधात समोर हजर झालेला नाही.निलंगा शहरातील शांतता अबाधित राहण्यासाठी सदरील गुन्हेगारी प्रवृत्तीचा दत्ता मोहळकर याला उस्मानाबाद,लातूर नांदेड या तीन जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी प्रस्ताव नमुद करण्यात आला आहे.हद्दपार व्यक्ती दत्ता मोहळकर सहा वेळा नोटीस पाठवून म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली.संबंधित संभाव्य हद्दपार इसमाची बाजू त्यांचे वकील अॕड माजिद शेख यानी बाजू मांडली होती.
या हद्दपारीच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत असून अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असणाऱ्या लोकावर कठोर पाऊल उपविभागीय अधिकारी शोभा जाधव उचत असून गुन्हेगारी करणाऱ्या लोकांचे धाबे दणाणले आहेत.