• Sun. Aug 24th, 2025

अनुष्का पनौती! स्टेडियममध्ये येण्यास बॅन करा, WTC फायनल गमावल्यानंतर चाहत्यांची सटकली

Byjantaadmin

Jun 12, 2023

ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप जिंकली आहे. टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात भारताचा २०९ धावांनी पराभव झाला. या विजयासह ऑस्ट्रेलिया सर्व आयसीसी ट्रॉफी जिंकणारा पहिला संघ ठरला आहे. त्याचबरोबर भारताला सलग दुसऱ्यांदा टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे.

ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाजांनी दोन्ही डावात शरणागती पत्करली. फलंदाजांसोबतच गोलंदाजांचीही अवस्था बिकट होती. डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत सलग दुसऱ्यांदा पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर चाहते खेळाडूंवर चांगलेच भडकले आहेत.

अनुष्का शर्मा पनौती

यानंतर सोशल मीडियावर काही युजर्सनी विराट कोहलीची पत्नी आणि स्टार अभिनेत्री अनुष्का शर्मावरही निशाणा साधला आहे. काही युजर्सनी अनुष्काला ट्रोल केले आहे. चाहत्यांचे असे म्हणणे आहे की, ‘ती जेव्हा ICC इव्हेंट्सना हजेरी लावते तेव्हा भारताची विजयाची टक्केवारी शून्य होते. त्याच वेळी, काही युजर्सनी अनुष्काला सर्व स्टेडियमध्ये येण्यास बंदी घालण्याची मागणी केली. यासोबतच अनेक यूजर्सनी अनुष्काला भारतीय संघासाठी पनौती असल्याचे म्हटले आहे.

स्टार फलंदाज सुपर फ्लॉप

WTC फायनलच्या पाचव्या दिवशी भारतीय फलंदाजांची कामगिरी अत्यंत लाजिरवाणी होती. संघाची सर्वात मोठी आशा विराट कोहली केवळ ४९ धावा करून बाद झाला. त्यानंतर रवींद्र जडेजाही शुन्यावर बाद झाला. यानंतर संपूर्ण संघ २३४ धावांव गारद झाला.

गेल्या १० आयसीसी स्पर्धांमधील भारताची कामगिरी

२०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी – अंतिम फेरीत इंग्लंडविरुद्ध विजय मिळवला

२०१४ T20 विश्वचषक – अंतिम फेरीत श्रीलंकेकडून पराभूत

२०१५ एकदिवसीय विश्वचषक – उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभूत

२०१६ T20 विश्वचषक – उपांत्य फेरीत वेस्ट इंडिजकडून पराभव

२०१७ चॅम्पियन्स ट्रॉफी – फायनलमध्ये पाकिस्तानकडून पराभव

२०१९ एकदिवसीय विश्वचषक – उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून पराभव

२०२१ कसोटी चॅम्पियनशिप – अंतिम फेरीत न्यूझीलंडकडून पराभूत

२०२२ T20 विश्वचषक – उपांत्य फेरीत इंग्लंडकडून पराभूत

२०२३ कसोटी चॅम्पियनशिप – अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभूत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *