महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालयातील ५० विद्यार्थी एमएचटी-सीईटी परीक्षेत घवघवीत यश
निलंगा- एमएचटी-सीईटी- २०२३ परीक्षेत महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालयातील १२ वी विज्ञान वर्गातील विद्यार्थ्यानी घवघवीत यश संपादन केलेले आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा पीसीबी व पीसीएम ग्रुपमध्ये एमएचटी-सीईटी मध्ये ५० विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह यश मिळवले आहे. निलंगासारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापुर्ण शिक्षण देण्यासाठी हे महाविद्यालय सतत प्रयत्नशिल असते.
पीसीबी ग्रुपमध्ये वैभवी गरिबसे (98.80), वैष्णवी आरीकर (98.70), राजश्री ब-हाणपुरे (98.40),बस्वराज बिराजदार (97.73), स्नेहदिप बाबर (95.16), सायली उसनाळे (93.60), कार्तिक स्वामी (91.94), अरखम मोमीन(91.79), कृतीका गावित (91.28), असलम शेख(90.06), साधना माने (89.28), मयुरी पाटील (87.35), प्राजक्ता कांबळे(86.55), श्रेया पाटील (85.62), सरस्वती चिंतले(85.32), प्रशांत मोरे(83.89), ईश्वरी पाटील (83.70), निकिता जाधव(82.36), साक्षी मुसांडे(81.19), प्राची कुरले (81.26) पर्सेंटाईल प्राप्त करुन घवघवीत यश संपादन केले आहे.
तसेच पीसीएम ग्रुपमध्ये कार्तिक स्वामी (96.02), श्रुती मुडबे (95.72), शिवाणी जाधव (95.10), राधा दरेकर(93.85), निकिता बुरकुले (92.15), गणेश सावरे (91.13), असलम शेख (90.69), अविष्कार राठोड (90.12), गायत्री सुर्यवंशी (89.95), योगिता घोडके (89.46), स्वप्निल जाधव (88.99), स्मिता वडवळे (88.46), अक्षता बिराजदार (88.27), ऋषीकेश पेठकर(87.93), प्रशांत मोरे(87.93), सुषांत चव्हाण (87.54), विजयश्री जाधव (86.05), साधना माने (85.92), शिवम जाधव (84.39), नागेश पौळकर(84.21), स्नेहा लादे (83.38), प्रतिक बोकडे (83.38), नागेश कोंगळे(83.37), स्नेहदिप बाबर(80.00) पर्सेंटाईल प्राप्त करुन उज्वल यश संपादन केले आहे
विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय शिवाजीराव पाटील, संस्थासचिव बब्रुवान सरतापे, संस्था समन्वयक दिलीपराव धुमाळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपुके, महाराष्ट्र औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भागवत पौळ, प्राचार्य डॉ. सिध्देश्वर पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. प्रशांत गायकवाड, विज्ञान विभागाचे समन्वयक प्रा. राजेंद्र कटके, सीईटी सेलचे समन्वयक श्रीराम पौळकर व महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करुन कौतुक केले आहे.