वडील आणि मुलीच्या नात्याला काळिमा फसणारी घटना उघडकीस आली आहे. नराधम बापाने आपल्या पोटच्या मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
छत्रपती संभाजी नगर: छत्रपती संभाजी नगर येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वडील आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी ही घटना आहे. नराधम बापाने आपल्या पोटच्या लेकीवर बलात्कार केला. हा प्रकार तब्बल दोन वर्षांपासून सुरू होता. धक्कादायक म्हणजे, ही बाब आईला सांगूनही तिने देखील या घटनेकडे भीतीपोटी दुर्लक्ष केले. अखेर हा त्रास असह्य झाल्याने पीडित मुलीने पोलिस ठाण्यात जात आपली आपबीती सांगितले तेव्हा पोलीसही गहिवरले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी ही १४ वर्षांची असून ती १२ वर्षांची असतांना पासून आरोपी बापाने तिच्यावर अत्याचार करण्यास सुरवात केली. पीडित मुलगी ही मोठी आहे. तिला आणखी एक छोटी बहीण आहे. असे असताना देखील नराधम बाप मुलीला छळत होता. त्याने तिच्या सोबत अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली होती. या प्रकाराला विरोध केल्यास नराधम बाप तिला मारहाण करत होता. हा प्रकार मुलीने आईला सांगितला मात्र, ती गर्भवती असल्याने तिने मुलीलाच शांत बसण्यास सांगितले. दरम्यान, बापाने मुलीवरील अत्याचार सुरूच ठेवले.
दोन दिवसांपूर्वी पीडित मुलगी घरात एकटीच असताना बापाने तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. याला विरोध केल्याने बापाने तिला जबर मारहाण केली. तिने ही घटना आईला सांगितले. मात्र, गर्भवती असलेल्या आईने पुन्हा तिलाच शांत केले. यावेळी तिच्या सहनशीलतेचा अंत झाला होता. तिने थेट सिडको पोलीस ठाणे गाठले. पण ती ठाण्यात गेली नाही. ती ठण्याबाहेर रडत बसली होती. एक मुलगी ठाण्याबाहेर बराच वेळ रडत असल्याचे चहा पिण्यासाठी बाहेर आलेल्या एका महिला पोलिसाला दिसले. तिने तिच्याजवळ जात आपुलकीने विचारपूस केली. तिला विश्वासात घेत ठाण्यात नेले. यावेळी मुलीने तिच्यावर बेतलेला प्रसंग सांगितल्यावर पोलिस देखील गहिवरले. पोलीस निरीक्षक संभाजी पवार, सहाय्यक निरीक्षक श्रद्धा वायदंडे यांनी तातडीने दखल घेत नराधम बापाला अटक केली.