शिवसेनेच्या शिंदे गटातील महिला पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार राडा झाला. पदे वाटपावरून निर्माण झालेला वाद थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला
नाशिकमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटातील महिला पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार राडा झाला. पदे वाटपावरून निर्माण झालेला वाद थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या उपस्थितीत नाशिकच्या शासकीय विश्रामगृहात बैठकीचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी बरखास्त करण्यात आलेली महिला आघाडी नव्याने पुनर्बांधणी करण्यासाठी पदे वाटपाचे नियोजन सुरू होते.मात्र या बैठकीमध्येजातिवाचक शिवीगाळ झाल्याने महिला पदाधिकाऱ्यांमध्ये राडा झाला व बैठक गुंडाळावी लागली.
हा वादपोलीस ठाण्यात गेल्यानंतर पुन्हा एकदा शिवसेनेच्या महिला पदाधिकारी लक्ष्मी ताठे आणि शोभा मगर एकमेकींना भिडल्या. विशेष म्हणजे, यावेळी शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या महिला पदाधिकारी शिवीगाळ करत एकमेकींवर धावून गेल्या. यावेळी उपस्थित पुरुष पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.
पद वाटपाबाबत चर्चा करत असताना शोभा मगर यांच्यासह त्यांच्या मुलाने जातिवाचक शिवीगाळ केल्याचाआरोप लक्ष्मी ताठे यांनी केला आहे. याशिवाय ताठे यांनी आरोप केला की, ज्या पक्षात शोभा मगर जातात तिथे त्या वाद घालतात.शिवसेनेत असतानात्यांनीमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोटोला काळे फासल्याचा आरोपही ताठे यांनीकेला आहे. शोभा मगर यांचा मुलगा धीरज मगर हा गुन्हेगार असून त्याने पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली होती,असेही ताठे यांनी म्हटले आहे. या घटनेनंतर शिवसेना शिंदे गट काय भूमिका घेतात,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.