• Mon. Aug 18th, 2025

एसटी-कंटेनरच्या धडकेत चार प्रवासी ठार

Byjantaadmin

Jun 11, 2023

पुणे सातारा मार्गावर शिरवळजवळ भीषण अपघात झाला असून एक एसटी बस कंटेनरला धडकली आहे. यात चार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

पुणे : सातारा रस्त्यावरील शिरवळजवळ एसटी आणि कंटेनरची भीषण धडक झाली आहे. या घटनेत चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पाच जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्याच्या दिशेने येत असलेल्या कंटेनरला एका एसटी बसने मागून जोराची धडक दिली. या धडकेत एसटी बस उलटली. बस उलटल्यामुळे बसमधील चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी आहेत. यावेळी एक कार देखील कंटेनरला मागून धडकली. मात्र, कारमधील प्रवासी सुरक्षित आहेत.

दरम्यान, सातारा रस्त्यावर या अपघातामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत, महामार्ग पोलिसांकडून वाहतूक कोंडी झाली असून ती सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

महामार्ग पोलिसांकडून वाहतूक कोंडी सोडवण्याचे काम सुरू आहे. हा अपघात एसटीच्या भोर आगाराच्या हद्दीमध्ये घडला आहे. आगारातील एसटीचे पथक घटनास्थळाकडे रवाना झाले आहे. स्थानिक नागरिकांकडून मदत कार्य सुरू आहे. पुणे – सातारा महामार्ग मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. एसटी चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास करण्याचे काम सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *