• Mon. Aug 18th, 2025

प्रतिक्षा संपली ! अखेर राज्यात मान्सूनचं आगमन; दक्षिण महाराष्ट्रात झाला सक्रिय

Byjantaadmin

Jun 11, 2023

राज्यात अखेर मॉन्सूनचे आगमन झाले आहे. या बाबत हवामान विभागाने माहिती दिली आहे. राज्याच्या दक्षिण भागात मॉन्सूनचे आगमन झाले आहे.

पुणे : बहुप्रतिक्षेत असेलल्या मॉन्सूनचे अखेर राज्यात आगमन झाले आहे. या संदर्भात हवामान विभागाने माहिती दिली आहे. राज्याच्या दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राचा काही भाग आज मान्सूनं व्यापाला आहे, असे ट्विट पुणे हवामान विभागाचे प्रमुख आणि हवामान तज्ज्ञ के. एस होसाळीकर यांनी ट्विट करून दिली आहे.नैऋत्य मान्सूनचे आज ११ जून ला महाराष्ट्रात आगमन झाले असून दक्षिण कोकणातील काही भाग, द.मध्य महाराष्ट्राचा काही भाग, संपूर्ण गोवा,कर्नाटकचा‌ व तामीळनाडू व आंध्रप्रदेशचा‌ काही भाग मॉन्सूनने व्यापला असल्याचे ट्विट त्यांनी केले आहे. रत्नागिरी, शिमोगा, हसन, धरमपुरी या ठिकाणी मॉन्सून सक्रिय झाला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मॉन्सून राज्यात कधी दाखल होईल या बाबत प्रतीक्षा होती. या वर्षी मॉन्सून लांबल्याने बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत होता. राज्यातील पेरण्या देखील रखडल्या होत्या. याच सोबत राज्यावर बिपरजॉय चक्रीवादळाचे देखील संकट होते.

भारतीय हवामान विभागाने रविवारी दिलेल्या अंदाजानुसार, ‘बिपरजॉय चक्रीवादळाने आपला मार्ग बदलला आहे. हे वादळ पूर्वमध्य अरबी समुद्रावर ११ जून रोजी मध्यरात्री २.३० वाजता पोरबंदरच्या दक्षिण-नैऋत्येस सुमारे ५१० किमी अंतरावर होते. येत्या काही तासांत हे वादळ तीव्र होऊन १५ जून पर्यंत हे वादळ पाकिस्तान तसेच सौराष्ट्र आणि कच्छच्या किनार्‍याला धडकण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *