एसटी मधील महिलांची हेळसांड व गैरसोय थांबवा अन्यथा शिवसेना महिला आघाडी सेना स्टाईल हिसका दाखवणार
निलंगा /प्रतिनिधी
निलंगा एसटी महामंडळाकडून महिलांची होणारी हेळसांड व गैरसोय पाहून ती थांबवण्यासाठी शिवसेना महिला आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आज अगर प्रमुखाला निवेदन देऊन महिलांची हेळसांड थांबवा अन्यथा शिवसेना स्टाईलने महिला आघाडी हिसका दाखवेल असा इशारा आज देण्यात आला.
गेल्या अनेक दिवसांपासून एसटी प्रवासात ये जा करत असलेल्या महिलांना पुरुष मंडळीकडून धक्काबुक्की अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. महिला प्रवासी यांना प्रथम एसटी मध्ये बसण्यासाठी आपण त्वरित सोय करावी. विशेषतः १५ जून पासून शाळा,कॉलेज सुरू होत आहेत. मुलींची संख्या जास्त असल्याने विद्यार्थ्यांशी मुलं जाणीवपूर्वक शरीराला स्पर्श करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे अनेकदा अश्या घटना घडल्या आहेत. यापूर्वीच आपल्याला महिला शिवसेनेच्या वतीने पूर्वकल्पना देण्यात येत आहे याची जाणीव ठेवून तातडीने उपाय योजना व महिलां सुरक्षेसाठी आपण पाऊले उचलावी. यदाकदाचित महिलांच्या व विध्यार्थीनी संदर्भात घाणेरडे कृत्य घडल्यास महिला शिवसेनेकडून सेना स्टाईल ने आंदोलन छेडण्यात येईल याची दखल घ्यावी या व्यतिरिक्त काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला सर्वस्वी एसटी आगार व्यवस्थापक हे जबाबदार असतील असे सांगून यापुढे शिवसेना महिला आघाडी शिवसेना स्टाईलनेच हिसका दाखवेल इशारा आज देण्यात आला यावेळी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या तालुका संघटिका रेखाताई पुजारी शिवसेना शहर प्रमुख सुनील नाईकवाडे महिला आघाडीच्या शहर संघटिका दैवता सगर महिला आघाडीच्या उपतालुका संघटिका अरुणाताई माने सविताताई पांढरे यांच्यासह असंख्य शिवसेना महिला आघाडीच्या महिला यावेळी उपस्थित होत्या.