सलग दुसऱ्या दिवशी महसुलची कारवाई वाळूने भरलेला हायवा पकडला ; ३ लाख ६ हजाराची दंडात्मक कारवाई
निलंगा/प्रतिनिधी
सलग दुसऱ्या दिवशी महसुल विभागाने उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध वाळू माफीया विरोधात कारवाई करत वाळूने भरलेला हायवा पकडून ३ लाख ६ हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की निलंगा तालुक्यातील कोकळगाव,औराद शाहजानी येथील तेरणा नदीपाञात जेसीबीच्या सहाय्याने वाळू काढून अवैधरित्या विक्री करून शासनाचे नुकसान करत असल्याचे उपजिल्हाधिकारी शोभा जाधव याना समजताच त्यानी तात्काळ चार कर्मचाऱ्यांचे पथक तयार करून स्वता राञभर गस्त घालून औराद शाहजानी व कोकळगाव येथील तीन ट्रॕक्टरवर गुन्हा दाखल करून १० लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.तसेच दिनांक ९ रोजी सकाळी ८.३५ वाजता शिऊर येथील अवैधरित्या वाळू विक्री वाळूने भरलेला हायवा क्रमांक एम.एच.२४ एयू ०३५२६ उपविभागीय अधिकारी कार्यालयातील पथकातील शाम भोसले,गंगाराम सुर्यवंशी तलाठी माधव मुळे यानी ड्रायव्हर राहूल सुर्यवंशीसह जिजाऊ चौकातून शहरात जात असताना धरून हायवा जप्त केला असून ३ लाख ६ हजार रूपयांची दंडात्मक कारवाई केली आहे.