आ. निलंगेकरांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पाल्यांच्या शिक्षणाचे स्वीकारले पालकत्व !
जि. प.ने बियाणे तर निलंगा खत बियाणे असोसिएशनने दिले खत
निलंगा (प्रतिनिधी)सततची नापिकी, कर्जबाजारीपणा यामुळे निलंगा तालुक्यातील 90 शेतकऱ्यांनी आपली जीवन यात्रा संपवली आहे. आशा आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पाल्याचे शिक्षण खंडित होऊ नये म्हणून अशा कुटुंबातील मुला-मुलींच्या शिक्षणाचे पालकत्व माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी स्वीकारले आहे,
निलंगा तालुक्यातीलआत्महत्याग्रस्त कुटुंबाला जिल्हा परिषद शेस फंडातून एक सोयाबीनची बॅग देण्यात आली तर निलंगा बी बियाणे खत असोसिएशनच्या वतीने एक डी. ए. पी. खताची बॅग मोफत देण्यात आली.
दि.8 जून रोजी निलंगा येथील साळुंके कॉम्लेक्स येथे जिल्हा परिषद लातूर यांच्या शेस फंडातून एक सोयाबीन बियाणे बॅग तर निलंगा तालुका खत असोसिएशन यांच्या वतीने एक सामाजिक बांधिलकी म्हणून एक डी ए पी खताची बॅग निलंगा तालुक्यातील 90 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाना मोफत देण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता,
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, निलंगा खत असोसिएशनचे अध्यक्ष विलास पाटील ,सचिव रवि कुलकर्णी,जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी सुभाष चोले,गट विकास अधिकारी, सोपान अकेले,जि प. च्या माजी उपाध्यक्ष भारतबाई सोळुंके ,खरेदी विक्री संघाचे चेअरमन सत्यवान धुमाळ ,औराद कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरसिंग बिरादार ,चेअरमन दगडू सोळुंके,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शेषराव ममाळे शिद्राम चाकोटे,सुभाष सोमाणी प्रताप विहीरे,आदी उपस्थित होते,
पंचायत समितीच्या शेतकऱ्यांसाठीच्या योजनाची माहिती गट विकास अधिकारी सोपान अकेले सांगताना म्हणाले ज्या ज्या पंचायत समितीच्या योजना आहेत यात ,विहीर ,गोठा ,शेततळे ,व घरकुला साठी विशेष बाब म्हणून आपण तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांना तात्काळ मंजुरी देऊन देण्याचे त्यांनी सांगितले ,
,,,साहेब! घरातील कर्ता पुरुषच गेला तर शेती करायची कोण असा भावनिक सवाल एका महिलेने विचारला ,,,,
विहीर शेत तळे पॉली हाऊस, गोठा घरकुल या सर्व योजना आहेत आमच्या घरात शेती करणारा कर्ता पुरुषच नाही ,आज आमच्या समोर ज्वलंत प्रश्न मुला मुलींच्या शिक्षणाचा आहे, शिक्षणाचा खर्च वाढला आहे आम्हाला चांगले व दर्जेदार शिक्षण देता येत नाही यासाठी काही तरी सोय करावी
यावर संवेदनशील मनाचे माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सततची नापिकी, कर्जबाजारीपणा यामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पाल्याचे शिक्षण खंडित होऊ नये म्हणून अशा कुटुंबातील मुला-मुलींच्या शिक्षणाचे पालकत्व स्वीकारले .
विविध कारणांमुळे शेतकऱ्यांना शेती करताना अडचणी येतात. सततच्या नापिकीमुळे कर्जाचा भरणा करणे अनेक शेतकऱ्यांना शक्य होत नाही. कर्जाची परतफेड कशी करावी याची चिंता शेतकऱ्यांना लागते. या चिंतेतूनच काही शेतकरी मृत्यूला कवटाळतात. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पाल्यांच्या शिक्षणात कोणताही खंड पडू नये म्हणून आक्का फाउंडेशच्या माध्यमातून माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी निलंगा तालुक्यातील येणाऱ्या शाळांमध्ये अशा कुटुंबातील पाल्यांना मोफत शिक्षण, शैक्षणिक साहित्य देण्याचा उपक्रम सुरू करण्याचे अभिवचन दिले . या अनुषंगाने आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पाल्यांच्या शिक्षणाचे पालकत्व स्वीकारले आहे. त्याच बरोबर उपस्थित प्रत्येक महिलेची वैयक्तिक, मुलामुलींची शैक्षणिक ,व सार्वजनिक अडचणीची विचारपूस केली आणि लेखी लिहून घेतली ,यापैकी एका मुलाने नीट क्रॅक केली आहे.त्याच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे,
,,शिद्रामअप्पा चाकोटे यांनी उचलला एका मुलाच्या शिक्षणाचा खर्च,,
निलंगा येथील रामलिंगेश्वर फर्टिलयझरचे मालक शिद्रामअप्पा चाकोटे यांनी आनंदवाडी हलगरा येथील चव्हाण कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलला आहे,
यावेळी जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी, सुभाष चोले म्हणाले जिल्हा परिषद शेष फंडातून निलंगा तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला एक सोयाबीनची बॅग देण्यात येत आहे, यावर निलंगा बी बियाणे खत असोसिएशनने आपण समाजाचे देने लागतो या सामाजिक बांधिलकीतुन आपल्या वैयक्तीक पैशातून प्रत्येक कुटुंबाला एक डी ए पी खताची बॅग दिली आहे, हे अतिशय उल्लेखनीय बाब आहे, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबना प्रशासनाच्या वतीने सर्वोतोपरी मदत केली जाईल विशेषबाब म्हणून कुटुंबातील काय गरजा आहेत याचा अभ्यास करून तात्काळ योजना देण्यात येतील,शेतीत मजुरांची टंचाई असल्यामुळे याना यांत्रिक मार्गदर्शन करून यांत्रिकीकरणावर भर द्यावे जिल्ह्यात बियाणे खत मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, कसलीच टंचाई होणार नाही असे शेवटी चोले यांनी बोलून दाखवले
यावेळी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अरविंद पाटील जाजनूरकर, राम काळगे , मधुकर अण्णा माकणीकर माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे , माजी नगराध्यक्ष वीरभद्र स्वामी किशोर लंगोटे पंचायत समिती कृषी अधिकारी, एन.एम कुटवाड ,विशाल ढाकणे ,कुलकर्णी ,शिवाजी शिंदे जगनाथ येवते ,बालाजी सोनवळकर,प्रसाद मठपती,दत्ता सुर्यवंशी, राजकुमार जाधव यांच्या सह निलंगा शहरा सह तालुक्यातील कृषी सेवा केंद्र दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मारुती शिंदे यांनी मानले.